VIDEO : भाईंदरमध्ये ठाण्याची पुनरावृत्ती, फेरीवाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला

| Updated on: Nov 29, 2021 | 6:53 AM

मिरा-भाईंदरमध्ये (Mira-Bhayandar) ठाण्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. इथे अनअधिकृ फेरीवाल्यावर कारवाई करण्यास गेलेल्या एका अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत अधिकाऱ्याला फक्त किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO : भाईंदरमध्ये ठाण्याची पुनरावृत्ती, फेरीवाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला
Mira Bhayandar Hawker attack on Officer
Follow us on

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये (Mira-Bhayandar) ठाण्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. इथे अनअधिकृ फेरीवाल्यावर कारवाई करण्यास गेलेल्या एका अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत अधिकाऱ्याला फक्त किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

भाईंदर पश्चिम बॉम्बे मार्केटजवळ रस्त्यावर बसत असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करता गेलेल्या पथक अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची संतापजनक घटना घडलीये. या फेरीवाल्याने चक्क लोखंडी रॉडने अधिकाऱ्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात अधिकाऱ्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भाईंदर पश्चिम येथील बॉम्बे मार्केट रस्त्यावर मोठ्या संख्येने फेरीवाले बसत अससतात. त्यामुळे रविवारी संध्याकाळी फेरीवाले पथक त्या ठिकाणी दाखल झाले. पथकाला पाहून त्या ठिकाणी उपस्थितीत फेरीवाले संतप्त झाले आणि चक्क एका फेरीवाल्याने कारवाईचा विरोध करत फेरीवाले पथक अधिकारी राकेश त्रिभुवन यांच्या हातावर लोखंडी रॉडने वार केला.

यावेळी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेकरीता सुरक्षा दल कर्मचारी उपस्थितीत होते. यावेळी सुरक्षा कर्मचारी आणि फेरीवाल्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या संदर्भात तक्रारदार पथक अधिकारी राकेश त्रिभुवन यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुट पाटील यांनी दिली.

कल्पिता पिंपळे यांची बोटं कापली 

गेल्या 30 ऑगस्टला ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

संबंधित बातम्या :

डोंबिवलीत बिअर फुकट दिली नाही म्हणून बार मॅनेजरला मारहाण, सीसीटीव्हीसह डिव्हीआर आणि रोकड घेऊन तरुण पसार

बारामतीत अल्पवयीन मुलाचा देवी बरोबर विवाह; अंनिस आणि पोलिसांनी मध्यस्थी करुन रोखले

मुंबईत क्रूरतेचा कळस : युवतीवर आधी बलात्कार, चाकूने 26 वार, मग हातोडीने डोके फोडले