डोंबिवलीत बिअर फुकट दिली नाही म्हणून बार मॅनेजरला मारहाण, सीसीटीव्हीसह डिव्हीआर आणि रोकड घेऊन तरुण पसार

या प्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी दीपेश म्हात्रे, विनायक पाटील अन्य दोन जणांच्या विरोधात लूट, खंडणी आणि धमकाविल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध पोलिस घेत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीत बिअर फुकट दिली नाही म्हणून बार मॅनेजरला मारहाण, सीसीटीव्हीसह डिव्हीआर आणि रोकड घेऊन तरुण पसार
डोंबिवलीत बिअर फुकट दिली नाही म्हणून बार मॅनेजरला मारहाण

डोंबिवली : बिअर फुकटात दिली नाही म्हणून तरुणांनी बार मॅनेजरला बेदम मारहाण करीत बारमध्ये तोडफोड केल्याची घटना डोंबिवलीत फोर सिझन बारमध्ये घडली आहे. एवढेच नाही तर बारच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर आणि रोकड लुटीचाही आरोप तरुणांवर आहे. या प्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. मात्र दारु दिली नाही म्हणून हॉटेलमध्ये घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

फोर सिझन बार व रेस्टॉरंटमध्ये घडला प्रकार

डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा परिसरात फोर सिझन बार व रेस्टॉरंट आहे. काल रात्री या बारमध्ये दारु घेण्यासाठी काही तरुण आले. हे तरुण खंबाळपाडा परिसरात राहणारे आहे. या तरुणांपैकी एकाने बार मॅनेजरकरुन टूबर्ग बिअर फुकट मागितली. बार मॅनेजरने बिअर फुकट देण्यास नकार दिला. बार मॅनेजरने आधी पैसे द्या मग बिअर देतो, असे सांगितले. या गोष्टीचा राग आलेल्या तरुणांनी या मॅनेजरला बेदम मारहाण केली. तसेच संगणकाची तोडफोड केली. सीसीटीव्ही आणि डीव्हीआर तसेच गल्ल्यातील 76 हजार रुपयांची रोकड लूटून पसार झाले.

आरोपींविरोधात मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल

नित्यानंद भंडारी असे मारहाण झालेल्या बार मालकाचे नाव असून त्यांच्यावर डोंबिवलीच्या आर. आर. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी दीपेश म्हात्रे, विनायक पाटील अन्य दोन जणांच्या विरोधात लूट, खंडणी आणि धमकाविल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध पोलिस घेत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीत रिक्षा उभी करण्याच्या वादातून मारहाण

दुसरीकडे रिक्षा उभी करण्याच्या वादातून 2 तरुणांना मारहाण करण्यात आल्याची घटना जुन्या डोंबिवलीत घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. या घटनेत एक तरुण सर्वेश दीक्षित जखमी झाला आहे. याप्रकरणाचा तपास विष्णूनगर करत आहे. (Bar manager beaten for not giving free beer in Dombivli)

डोंबिवलीत रिक्षा उभी करण्याच्या वादातून मारहाण

दुसरीकडे रिक्षा उभी करण्याच्या वादातून 2 तरुणांना मारहाण करण्यात आल्याची घटना जुन्या डोंबिवलीत घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. या घटनेत एक तरुण सर्वेश दीक्षित जखमी झाला आहे. याप्रकरणाचा तपास विष्णूनगर करत आहे.

इतर बातम्या

बारामतीत अल्पवयीन मुलाचा देवी बरोबर विवाह; अंनिस आणि पोलिसांनी मध्यस्थी करुन रोखले

मुंबईत क्रूरतेचा कळस : युवतीवर आधी बलात्कार, चाकूने 26 वार, मग हातोडीने डोके फोडले

Published On - 12:08 am, Mon, 29 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI