मनसे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील हत्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक, 13 दिवसांमध्ये गुन्ह्याचा छडा

या प्रकरणात पोलिसांनी कडक कारवाई करत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मनसे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील हत्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक, 13 दिवसांमध्ये गुन्ह्याचा छडा

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात बुधवारी मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील (MNS Rakesh Patil) यांची भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी कडक कारवाई करत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी आधीच 4 आरोपींना अटक केली होती. यानंतर आता मुख्य आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली असून अवघ्या 13 दिवसांमध्ये आरोपीचा छडा लावला आहे. (MNS city vice president Rakesh Patil murder case main accused Arrest)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डी मोहन असं राकेश पाटील हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आज कोर्टात हजर करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेमुळे अंबरनाथमध्ये मोठी खळबळ उडाली होती. रिलायन्स रेसिडेन्सी परिसरात हा प्रकार घडला होता. संध्याकाळी सुमारास राकेश पाटील हे आर मार्टजवळ उभे होते. त्यावेळी डी मोहन आणि त्याच्या साथीदारांनी राकेश पाटील यांच्यावर हल्ला केला.

हल्लेखोरांनी राकेश पाटील यांना खाली पाडत त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी वार केले. यामध्ये पोटात आणि मानेवर वर्मी घाव बसल्याने राकेश गंभीर जखमी झाले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने आधी उल्हासनगरच्या एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. याठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोर्टिस हॉस्पिटलबाहेर धाव घेतली. तर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू करत आरोपींचा शोध सुरू केला आणि 13 दिवसांतच आरोपीचा शोध घेतला. राकेश पाटील यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी दोन गाड्यांमधून पळून गेले होते. त्यापैकी एक गाडी अंबरनाथमार्गे मुरबाडच्या दिशेने गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. या दिशेने शोध घेत पोलिसांनी आरोपीचा तपास केला.

यानंतर मुरबाड पोलिसांनी रायता परिसरात नाकाबंदी केली आणि काही वेळातच आरोपी पळून जात असलेली गाडी पोलिसांनी पकडली. या गाडीतून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. पोलीस सध्या सर्व आरोपींची कसून चौकशी करत असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

इतर बातम्या – 

राकेश पाटील हत्या प्रकरण; बाळा नांदगावकरांनी घेतली राकेश यांच्या कुटुंबीयांची भेट; राज ठाकरेंकडूनही कुटुंबीयांचे फोनवरुन सांत्वन

अंबरनाथमध्ये भररस्त्यात मनसे शहर उपाध्यक्षावर टोळक्याचा हल्ला; धारदार शस्त्रांनी वार, उपचारादरम्यान मृत्यू

(MNS city vice president Rakesh Patil murder case main accused Arrest)

Published On - 7:58 am, Thu, 12 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI