Bhonga: आता थिएटरमध्येही वाजणार ‘भोंगा’; मनसेकडून पत्रकार परिषदेत घोषणा

| Updated on: Apr 21, 2022 | 1:46 PM

राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून (Loudspeaker) चांगलंच राजकारण तापलंय. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 1 मे रोजी औंरगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं जाहीर केलंय. तर 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारला इशारादेखील दिला आहे.

Bhonga: आता थिएटरमध्येही वाजणार भोंगा; मनसेकडून पत्रकार परिषदेत घोषणा
मनसे प्रदर्शित करणार 'भोंगा' चित्रपट
Image Credit source: Twitter
Follow us on

राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरून (Loudspeaker) चांगलंच राजकारण तापलंय. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 1 मे रोजी औंरगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं जाहीर केलंय. तर 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारला इशारादेखील दिला आहे. आता याच विषयावरून मनसेनं आणखी एक निर्णय घेतला आहे. मशिदींवर भोंगे हटवण्याच्या भूमिकेला आणखी जोर देत मनसेनं आता ‘भोंगा’ (Bhonga) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांच्या हस्ते ‘भोंगा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून आजवर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही.

एकीकडे राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत भोंग्यांसंदर्भात अल्टिमेटम दिला असून दुसरीकडे त्याच दिवशी ‘भोंगा’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा घोषणा मनसेकडून करण्यात आली आहे. 2018 मध्ये हा चित्रपट तयार झाला. त्यानंतर या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासह इतरही अनेक पुरस्कार मिळाले. मात्र थिएटरमध्ये हा चित्रपट अद्याप प्रदर्शित होऊ शकला नाही. आता भोंग्यांच्या मुद्द्याला जोर देण्यासाठी मनसेनं हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

अमेय खोपकरांचं ट्विट-

भोंगा या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी केलं आहे. यामध्ये अभिनेत्री दिप्ती धोत्रे, कपिल गडसुरकर, अमोल कागणे, श्रीपाद जोशी, आकाश घरत, दिलीप डोंबे, अरुण गीते, सुधाकर बिराजदार, रमेश भोळे, दिपाली कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत. एका कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बाळाला दुर्धर आजार झालेला असतो. या आजारामुळे बाळाला उच्च ध्वनीचा अधिक त्रास होतो. भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर सतत परिणाम होऊन त्याचा त्रास वाढत जातो. हा त्रास संपूर्ण गाव पाहत असतो आणि तो कमी करण्यासाठी ते काय पाऊल उचलतात हे या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.

हेही वाचा:

‘लग्न.. लग्न.. लग्न..’; लग्नपत्रिकेवर छापला KGF 2 मधील यशचा डायलॉग; वाचून तुम्हीही पोट धरून हसाल!

Chandramukhi Trailer: चंद्रा, दौलतराव, दमयंतीची नाट्यमय कहाणी; ‘चंद्रमुखी’च्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांसाठी खास सरप्राइज