नवी मुंबईत मनसेचं ‘हॉर्न वाजवा’ आंदोलन, खारघरमध्ये मनसैनिक ताब्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (12 जून) राज्यातील विविध भागात 'हॉर्न वाजवा' आंदोलन (MNS horn ok please protest ) करण्यात आलं.

नवी मुंबईत मनसेचं 'हॉर्न वाजवा' आंदोलन, खारघरमध्ये मनसैनिक ताब्यात

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (12 जून) राज्यातील विविध भागात ‘हॉर्न वाजवा’ आंदोलन (MNS horn ok please protest ) करण्यात आलं. नवी मुंबईतही मनसेचे नेते गजानन काळे यांच्या नेतृत्वात संध्याकाळी 5 वाजता एक मिनिटासाठी ‘हॉर्न वाजवा आंदोलन’ करण्यात आलं. मनसेच्या या आंदोलनात राज्यातील अनेक वाहतूक संघटना सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता (MNS horn ok please protest ).

दरम्यान, या आंदोलनाची पूर्व कल्पना न दिल्यामुळे पोलिसांनी मनसेचे खारघर शहराध्यक्ष प्रसाद परब आणि काही मनसैनिकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर थेड्या वेळात समज देऊन सोडून देण्यात आलं.

गेले अडीच महिने लॉकडाऊनमुळे टॅक्सी, रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक वाहतूक व्यवसाय बंद आहे. यावर उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो कुटुंबियांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. वाहतूक क्षेत्रातील कामगारांच्या वेदनेचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचावा, वाहतूक क्षेत्रातील समस्यांकडे लक्ष वेधले जावे आणि शासनाकडून या चालकांना मदत मिळावी, यासाठी मनसेने हॉर्न वाजवा आंदोलन केले.

लॉकडाऊनच्या काळातील नुकसान भरुन काढण्यासाठी महाराष्ट्राशेजारी असलेल्या अनेक राज्यांनी वाहनचालकांना दिलासा दिला आहे. दिल्ली, पंजाबसह अन्य राज्यांनी आर्थिक मदतही केली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारला वाहतूकदारांच्या मागण्यांवर साधी चर्चा करणेही योग्य वाटत नसल्याची खंत वाहतूक शाखेने व्यक्त केली आहे.

तीन महिने उलटल्यानंतरही वाहतूक क्षेत्रासाठी धोरण जाहीर केलेले नाही. वाहतूकदारांच्या समस्यांबाबत राज्य सरकार झोपेचे सोंग घेत आहे, त्यांना जागे करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडून सांगण्यात आलं होतं.

संबंधित बातमी :

खळ्ळखट्यॅक ऐवजी पॉ-पॉ! ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी मनसेचं ‘हॉर्न वाजवा आंदोलन’

Published On - 8:10 pm, Fri, 12 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI