राज ठाकरेंची मुंबईत मनसेच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक; आगामी निवडणुकांसाठी काय आदेश देणार?

| Updated on: Jan 15, 2021 | 8:01 PM

पक्षातील पदाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. | Raj Thackeray will talk with party leaders

राज ठाकरेंची मुंबईत मनसेच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक; आगामी निवडणुकांसाठी काय आदेश देणार?
Raj Thackeray. (File Photo: IANS)
Follow us on

मुंबई: राज्यातील आगामी ग्रामपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी मनसेची (MNS) महत्त्वाची बैठक होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेचे प्रमुख नेते आणि सरचिटणीसांना या बैठकीसाठी पाचारण केले आहे. साधारण सकाळी 10 वाजता राज ठाकरे वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये या बैठकीला सुरुवात होईल. (Raj Thackeray will meet MNS leaders in Mumbai)

राज ठाकरे या बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्याशी वैयक्तिकरित्या संवाद साधणार आहेत. पक्षातील पदाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना काय आदेश देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य सरकारने नुकताच राज ठाकरे यांच्यासह राज्यातील प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे (Raj Thackeray) यांची झेड (z) दर्जाची सुरक्षा काढून घेऊन त्यांना वाय (Y+) दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यानंतर मनसेच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर सडकून टीका केली जात आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सक्रिय

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत कृष्णकुंजवर बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये राज ठाकरे विविध जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत आहेत. सोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा जोमाने उतरेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा, राज ठाकरेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना आगामी ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचे आदेश दिले होते. जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यासाठी वेळ पडल्यास स्थानिक पातळीवर इतर पक्षांशी युती करण्याची रणनीती मनसेकडून आखली जात आहे.

संबंधित बातम्या:

राज ठाकरेंसोबत मनसेच्या 50 पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक, पक्षात मोठ्या बदलाचे संकेत

महाविकास आघाडीला शह देण्याचा प्लॅन, नाशिक सभापती निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येण्याची चिन्हं

(Raj Thackeray will meet MNS leaders in Mumbai)