वसंत मोरे यांचा एका वाक्यात विषय आटोपला; बाबू वागस्करांची थेट प्रतिक्रिया काय?

वसंत मोरे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्याने पुण्यात आता ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. वसंत मोरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला, यावर मनसे नेते बाबू वागस्कर यांची प्रतिक्रिया दिली आहे.

वसंत मोरे यांचा एका वाक्यात विषय आटोपला; बाबू वागस्करांची थेट प्रतिक्रिया काय?
| Updated on: Jul 09, 2024 | 7:09 PM

विधानसभा निवडणुकीअगोदर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घड्यामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीआधी नगरसेवक वसंत मोरे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी मनसे सोडत वंचित बहुजन आघाडीकडून लढणाऱ्या मोरेंनी आता ठाकरे गटाची वाट धरलीये. आज मंगळवारी वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं. वसंत मोरे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्याने पुण्यात आता ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. वसंत मोरे यांच्यासह मनसेच्या 17 शाखाध्यक्ष आणि 5 उपविभागाध्यक्षांनी प्रवेश केला , यावर मनसे नेते बाबू वागस्कर यांची प्रतिक्रिया दिली आहे.

वसंत मोरे हा विषय आमच्यासाठी संपला आहे. आमच्या पक्षातील कोणीही आज प्रवेश केला नाही. जे गेलेत ते त्यांचे पदाधिकारी आहेत, वसंत मोरे यांना शुभेच्छा, असं म्हणत बाबू वागस्कर यांनी एका वाक्यात विषय आटोपला. वसंत मोरे यांनी पक्षप्रवेशावेळी येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये 25 उमेदवार निवडून आणणार असल्याचं म्हटलं आहे.

 

बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो 1992 मध्ये शिवसेनेत सामील झालो. वयाच्या 31 व्या वर्षांपर्यंत विभाग प्रमुख झालो. नंतर मनसेत गेलो आता शिवसेनेत आलोय. पुणे शहरात भविष्यात पुणे शहरात किमान 25 नगरसेवक निवडून आणणार, असं वसंत मोरे यांनी सांगितलं. मोरेंच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

वसंत मोरे खूप पुढे आले असून ते मातोश्री पर्यंत पोहोचले आहेत त्यांना आहे तिथेच थांबू. तात्या लोकसभा निवडणूक लढले त्यांचं शेवटचं डेस्टिनेशन मातोश्री असून ते जुने शिवसैनिक आहे. त्यांना उध्दव ठाकरे यांनी आशीर्वाद दिले ते शिवसेनेत आल्यामुळे पुणे खडकावसला येथे शिवसेनेची ताकत वाढणार आहे. आपण सर्वांनी मिळून पुण्यातली शिवसेना पुढे नेऊया, असं राऊत म्हणाले.