AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AI युगात मराठी टिकवायची असेल तर फक्त 5 पर्याय, राज ठाकरेंकडून मराठी भाषिकांचे डोळे उघडणारी पोस्ट

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरे यांनी मराठी भाषिकांना आवाहन केले आहे की त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सक्षम राहण्यासाठी जास्तीत जास्त उच्च दर्जाचा डिजिटल डेटा मराठी भाषेत तयार करावा.

AI युगात मराठी टिकवायची असेल तर फक्त 5 पर्याय, राज ठाकरेंकडून मराठी भाषिकांचे डोळे उघडणारी पोस्ट
raj thackeray marathi
| Updated on: Feb 27, 2026 | 11:02 AM
Share

दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस भारतात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला मराठी भाषा दिन असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हा दिवस खूप उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो. याच मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषिकांना एक अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence – AI) युगात मराठी भाषेला सक्षम आणि शक्तिशाली करण्यासाठी मराठी भाषिकांनी जास्तीत जास्त उच्च दर्जाचा डेटा (Data) निर्माण करावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मराठी भाषेसह एआय डिजीटल माध्यम यावर भाष्य केले आहे. यावेळी राज ठाकरेंनी डेटाचे महत्त्व सांगितले आहे. “जमिनीत शेती शोधल्यापासून ते औद्योगिक क्रांतीपर्यंत शक्तीचे स्रोत बदलत गेले. डिजिटल युगात डेटा ही सर्वात मोठी शक्ती आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात ज्या भाषांमधून जास्तीत जास्त डेटा तयार होईल, ती भाषा शक्तिशाली ठरेल”, असे राज ठाकरे म्हणाले.

यावेळी राज ठाकरेंनी मराठी भाषिकांना ५ मुख्य सल्ले दिले आहेत. मराठी भाषा डिजिटल जगात ज्ञानाची वाहक बनवायची असेल तर त्यांनी काही उपाय सुचवले आहेत.

  • समाज माध्यमांवर मराठीचा वापर: सोशल मीडियावर जास्तीत जास्त मराठीत व्यक्त व्हा. मात्र, टीका किंवा द्वेष पसरवण्याऐवजी सकारात्मक माहिती टाका.
  • ब्लॉग आणि पॉडकास्ट: तुम्ही ज्या क्षेत्रात तज्ज्ञ आहात, त्या क्षेत्रातील माहिती मराठीतून ब्लॉग्स किंवा पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा.
  • डिजिटल विश्वकोश: मराठी भाषिकांनी पुढाकार घेऊन डिजिटल विश्वकोश तयार करावेत.
  • शिक्षण प्रणालीत AI: शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ती हाताळण्याची कला मराठीतून शिकवली जावी.
  • कोडिंग आणि तंत्रज्ञान: मराठीत उत्तम दर्जाचा डेटा तयार करून AI प्रणालींना समृद्ध करा, जेणेकरून भविष्यात उत्तम संधी मराठीत उपलब्ध होतील.

मराठी माणूस स्वतःचे मोठे साम्राज्य उभे करू शकतो

या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी अँथ्रोपिक (Anthropic) कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी राहुल पाटील यांचा उल्लेख केला. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या कमी होण्याची भीती असली, तरी या तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी माणूस स्वतःचे मोठे साम्राज्य उभे करू शकतो. आता आपल्याला मराठी भाषेतून ज्ञान मिळवण्याबाबतचे सार्वभौमत्व मिळवणे शक्य आहे, ही संधी सोडू नका, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...