कोरोनाग्रस्त रुग्णांची नावं जाहीर करा, मनसेची मागणी

| Updated on: Mar 17, 2020 | 9:12 PM

कोरोनाग्रस्त रुग्णांची नावं जाहीर करा, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांची नावं जाहीर करा, मनसेची मागणी
संदीप देशपांडे, मनसे
Follow us on

मुंबई : कोरोनाग्रस्त रुग्णांची नावं जाहीर करा, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande) यांनी राज्य सरकारकडे केली आहे. “कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण गुन्हेगार किंवा आरोपी नाहीत. याशिवाय त्यांना HIV सारख्या आजाराची लागण झालेली नाही. त्यांना कुणीही वाळीत टाकणार नाही. आपला समाज यातून सकारात्मकच भूमिका घेईल”, असं संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande) म्हणाले.

“कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचं नाव जाहीर केल्यास यातून जनजागृती वाढेल. जी लोक पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आली आहेत ते स्वत:हून जागरुक होतील. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हे अतिशय गरजेचं आहे”, असंदेखील संदीप देशपांडे म्हणाले.

कोरोनाबाधित रुग्णाचं नाव सोशल मीडियावर जाहीर झाल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबाला त्रासाला सामोरं जावं लागल्याची माहिती समोर आली होती. पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबाला काळजीसोबतच मनस्तापालाही सामोरं जावं लागलं होतं.

हेही वाचा : Corona | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 17 वर, पिंपरीत एकाला लागण

या प्रकरणी रुग्णाच्या कुटुंबियांनी आपल्यावर सामाजिक बहिष्कार टाकून वाळीत टाकल्याचा आरोप केला होता. त्यामुळे कुटुंबियांनी वकिलांच्या माध्यमातून थेट विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती.

यानंतर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कोरोना बाधित रुग्णाचे नाव जाहीर न करण्याचं आवाहन केलं होतं. याशिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांचं नाव अतिउत्साहाच्या भरात सोशल मीडियावरुन उघड केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता.

राज्यात कोरोना दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 41 वर पोहोचली आली. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे.

संबंधित बातम्या :

पुणे शहरातील हॉटेल्स आणि बार तीन दिवस बंद

Corona Updates LIVE: सर्व सरकारी कार्यलये पुढील सात दिवस बंद राहणार – सूत्र