AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 17 वर, पिंपरीत एकाला लागण

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या ही 17 वर पोहोचली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी याबाबतची माहिती (Pune Divisional commissioner On Corona) दिली. 

Corona | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 17 वर, पिंपरीत एकाला लागण
| Updated on: Mar 17, 2020 | 5:55 PM
Share

पुणे : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 40 वर पोहोचली आहे. नुकतंच पिंपरी चिंचवड क्षेत्रात आणखी एकाला कोरोनाची (Pune Corona Patient increase) लागण झाली आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या ही 17 वर पोहोचली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी याबाबतची माहिती दिली.

पुण्याचे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गेल्या 18 नवे संशयित लोक आले (Pune Corona Patient increase) आहेत. तर 24 तासात 32 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या 24 तासात 1 नवा पॉझिटिव्ह पिंपरी चिंचवड क्षेत्रात आढळून आला. हा रुग्ण 14 मार्चला अमेरिकेतून दुबईमार्गे मुंबईतून पुण्यात आला. त्यांच्याशी संबंधित असलेल्या सर्वांची तपासणी सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 17 वर पोहोचली आहे.”

पुणे शहरातील हॉटेल्स आणि बार तीन दिवस बंद

“पिंपरी-चिंचवड परिसरात 100 पथकं स्थापन करण्यात येत आहेत. विदेशातून विमानतळांवर येणाऱ्यांसाठी तोच प्रोटोकॉल वापरला जाईल. त्यात फक्त एक सुधारणा केली जाईल. 19 मार्चपासून विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांना 24 तास कॉरंटाईन केलं जाईल. तिथे तपासणी करुन त्यांना होम किंवा कॉरंटाईन हवं असेल तर होम अन्यथा इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईन केलं जाईल. परदेशातून येणाऱ्यांनी कॉरंटाईनचे नियम तोडले तर कठोर कारवाई करणार,” असेही विभागीय आयुक्त यावेळी म्हणाले.

“तसेच जे नियम तोडणाऱ्यांचे काहीही ऐकलं जाणार नाही. एका व्यक्तीसाठी पूर्ण समाजाला वेठीस धरणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व शासकीय कार्यालये सात दिवस बंद राहतील,” असेही म्हैसेकर म्हणाले.

“शहरातील गर्दी टाळण्यासाठी नवीन लायसन 31 मार्च पर्यत बंद करण्यात आले आहेत. ज्यांना आपली लायसन रिन्यू करायची आहेत त्यांनी ऑनलाइन करावीत. आरटीओचे मार्फत देण्यात येणारे सर्व परवाने 31 मार्च पर्यत बंद असणार आहेत. तर 31 मार्चपर्यत आधार कार्ड दिली जाणार नाही,” असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले आहे.

Platform Ticket | रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट 10 वरुन 50 रुपये, गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय

“तर 26 हजार 315 लोकांची घर तपासली आहेत. पुणे विमानतळावर 148 प्रवाशी आलेत. पीएमपीएलएमच्या बस कमी करण्यात आल्या आहेत. 583 बसेस बंद केल्या. प्रवाशी संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला. ही संख्या एका दिवसात 12 लाखांवरुन 9 लाखांवर आली आहे,” अशीही माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.

“नवे आधारकार्ड 31 मार्चपर्यंत बंद करण्यात येणार आहे. आधारकार्डसाठी बायोमेट्रिक करावं लागतं त्यामुळे आता नवे कार्ड देण्यात येणार नाहीत. राज्य सरकारने आजपासून 7 दिवस सर्व सरकारी कार्यालये बंद केली, अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, माझं कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जे जे कोरोनाशी लढा देत आहेत ती कार्यालये सुरु राहतील,” असेही पुणे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

“पुणे RTO मार्फत देण्यात येणारे सर्व परवाने बंद करण्यात येणार आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर  RTO कार्यालयातून 31 मार्चपर्यंत कोणतेही नवे लायसन्स दिले जाणार नाही, लायसन्स रिन्यू ऑनलाईन करु शकतात,” असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले.

“आमच्याकडे काही तक्रारी येत आहेत, माहिती येत आहे, जे परदेशातून येत आहेत त्यांना जास्त पद्धतीने तपासण्याचा निर्णय घेतला आहे, जर त्यांनी क्वारंटाईनचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई करू,” असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले.

“जर ठरवून दिलेल्या दिवसांपेक्षा संबंधित व्यक्ती बाहेर आली तर कारवाई करु, परदेशातून येणाऱ्यांनी कॉरंटाईनचे नियम तोडले तर कठोर कारवाई करु. एका व्यक्तीसाठी पूर्ण समाजाला वेठीस धरणार नाही,” असेही त्यांनी (Pune Corona Patient increase) सांगितले.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.