कॅन्सर पीडिताचे पैसे देईना, बियर शॉप चालकाला मनसेची लाईव्ह मारहाण

वसई: कॅन्सरपीडित व्यक्तीचे 16 लाख रुपये देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बियर शॉप चालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करुन मारहाण केली. राजू शेट्टी असं या बियर शॉप चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. राजू शेट्टी यांनी एका कॅन्सरपीडित मराठी माणसाचे 16 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. ते पैसे देण्यास शेट्टी टाळाटाळ करत होते, […]

कॅन्सर पीडिताचे पैसे देईना, बियर शॉप चालकाला मनसेची लाईव्ह मारहाण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

वसई: कॅन्सरपीडित व्यक्तीचे 16 लाख रुपये देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बियर शॉप चालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करुन मारहाण केली. राजू शेट्टी असं या बियर शॉप चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. राजू शेट्टी यांनी एका कॅन्सरपीडित मराठी माणसाचे 16 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. ते पैसे देण्यास शेट्टी टाळाटाळ करत होते, त्यामुळेच मनसे नेते अविनाश जाधव यांनी त्याबाबतचा जाब विचारत, त्यांना लाईव्ह मारहाण केली.

जर पैसे नाही दिले तर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही अपलोड करण्यात आला. यावेळी पालघर जिल्हाध्यक्ष जयेंद्र पाटील, वसई शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांच्यासह अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. मंगळवारी संध्याकाली साडे सातच्या सुमारास विरार पश्चिम या परिसरात ही घटना घडली.

कॅन्सर पीडीत वृद्धांना जेव्हा फसवतात,.अशा समाजकंटकांना ठोकायचे नाहीतर काय करायचे ?? जर सर्वसामान्य जनतेला रोज बिल्डर लॉबी लुबाडायला लागली तर मग पोलीस यंत्रणा आणि शासनाची भूमिका काय.?? कोणीही येतं आणि गोरगरिबांना फसवताय.. कोणाचाच अंकुश नाही… अशाने गरिबांना त्यांचे पैसे त्यांची घरे सन्मानीय कोर्ट देणार का…? असे प्रश्न मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले आहेत.

“विरार एक सर्वात मोठा गोरगरीब जनतेला फसवणाऱ्या भामट्यांचा अड्डा आहे. हजारो लोक घराच्या प्रतीक्षेत आहेत. कोणीच काही बोलायला तयार नाही. गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. मराठी असो किंवा इतर कोणत्याही जाती धर्माचा न्याय सगळ्यांना मिळालाच पाहिजे. लवकरच भेट होईल. पोलिसांनी आता तरी गरीब वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करावी. अशा भामट्यांची धिंड काढलीच पाहिजे” असं मनसेने म्हटलं आहे.

VIDEO:

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.