धर्मसंसदेतील वक्तव्य हिंदुत्वाला अभिप्रेत नसणारी, मोहन भागवत यांचं वक्तव्य, सावरकरांचांही दिला दाखला

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी धर्म संसदेच्या बॅनर खाली आयोजित होणाऱ्या कार्यक्रमातील वक्तव्य आणि हिंदुत्वाशी संबंधित गोष्टींबाबत असहमती दर्शवली आहे.

धर्मसंसदेतील वक्तव्य हिंदुत्वाला अभिप्रेत नसणारी, मोहन भागवत यांचं वक्तव्य, सावरकरांचांही दिला दाखला
mohan bhagwat
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 11:07 AM

मुंबई :राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी धर्म संसदेच्या बॅनर खाली आयोजित होणाऱ्या कार्यक्रमातील वक्तव्य आणि हिंदुत्वाशी संबंधित गोष्टींबाबत असहमती दर्शवली आहे. भागवत यांनी धर्मसंसदेत बोलली गेलेली भाषा ही हिंदुत्वाच्या भाषेला अनुरुप नव्हती, असं म्हटलंय. ज्या गोष्टी रागाच्या भरात केल्या जातात त्यात हिंदुत्वाला अनसुरुन नसतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईतील (Mumbai) एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी आरएसस आणि हिंदुत्वावर विश्वास असणारी माणसं अशा गोष्टी बोलत नाहीत, असं म्हटलंय. डिसेंबर महिन्यात हरिद्वारमध्ये आयोजित धर्मसंसदेत मुस्लीम धर्मीय व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं होतं. तर, रायपूरमध्ये आयोजित धर्मसंसदेत महात्मा गांधी यांच्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केली गेली होती.

सावरकरांनी हिंदुंना संघटित करण्याविषयी सांगितलं

मोहन भागवत यांनी वीर सावरकर यांनी हिंदू समुदायाला संघटित आणि एकत्रित करण्यासंदर्भात भाष्य केलं होतं. मात्र, त्यांनी हे वाक्य भगवतगीतेच्या संदर्भात सांगितलं होतं. ते वाक्य कुणाला संपवणं किंवा नुकसान पोहोचवणं नव्हतं, असं भागवत म्हणाले. भारताची वाटचाल हिंदू राष्ट्र होण्याकडे सुरु आहे का असं विचारलं असता भागवत यांनी आपल्या संविधानाची प्रकृती हिंदुत्व सांगणारी आहे, असं म्हटलंय. देशाच्या एकतेची आणि अखंडतेची भावना महत्वाची आहे. विविधतेचा अर्थ विघटन असा होत नसल्याचं ते म्हणाले. संघाचं काम लोकांमध्ये फुट पाडणं हे नसून त्यांच्यातील मतभेद दूर करणं हा असल्याचं मोहन भागवत म्हणाले.

वीर सावरकरांनी हिंदू समुदाय एकत्रित आणि संघटित झाल्यास तो भगवतगीतेबद्दल बोलू लागेल. तो कुणाला संपवणं किंवा कुणाचा नुकसान करणं याविषयी बोलणार नाही असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

धर्मसंसदेत वादग्रस्त वक्तव्य

डिसेंबर महिन्यात हरिद्वारमध्ये आयोजित धर्मसंसदेत मुस्लीम धर्मीय व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं होतं. तर, रायपूरमध्ये आयोजित धर्मसंसदेत महात्मा गांधी यांच्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केली गेली होती. महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं कालीचरण महाराज याला अटक करण्यात आली होती.

इतर बातम्या:

Hrishikesh Kanitkar: अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या संघाचे पुणेकर कोच ऋषीकेश कानिटकरांबद्दल जाणून घ्या…

कायद्याचे तीन तेरा, गजानन महाराजांच्या शेगावात थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला, नेमकं काय घडलं?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.