Mohit Kamboj : मोहित कंबोज यांना कोर्टाचा दिलासा तर पालिकेला दणका, नोटीसा दिलेल्या कारवाई थांबवण्याचे आदेश

भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांना मुंबई सत्र न्यायालयातून मोठा दिलासा मिळाला आहे. कंबोज यांच्या खार स्थित निवासस्थाने केलेल्या अवैध बांधकाम संदर्भात मुंबई महानगरपालिकाने जी  नोटीस पाठवली होती, त्या नोटीसीला सत्र न्यायालयाने आज  स्थगिती दिली आहे .

Mohit Kamboj : मोहित कंबोज यांना कोर्टाचा दिलासा तर पालिकेला दणका, नोटीसा दिलेल्या कारवाई थांबवण्याचे आदेश
मोहित कंबोज
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Jun 15, 2022 | 7:31 PM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे नाव चागलेच चर्चेत आहे. मोहित कंबोज हे नाव काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांशीही (Devendra Fadnavis) जोडलं. तर मोहित कंबोज हेही महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. संजय राऊत आणि नवाब मलिक यांचा उल्लेख ते सतत सलीम जावेदची जोडी म्हणून करतात. मात्र याच मोहित कंबोज यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांत मुंबईत महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला होता. आता मात्र  भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांना मुंबई सत्र न्यायालयातून मोठा दिलासा मिळाला आहे. कंबोज यांच्या खार स्थित निवासस्थाने केलेल्या अवैध बांधकाम संदर्भात मुंबई महानगरपालिकाने जी  नोटीस पाठवली होती, त्या नोटीसीला सत्र न्यायालयाने आज  स्थगिती दिली आहे .

मोहित कंबोज यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

पोलिकेला मोठा दणका

या नोटीसीला स्थगिती हा कंबोज यांना मोठा दिलासा आहे. तर पालिकेला हा मोठा दणका आहे. कारण पालिका ही शिवसेना नेत्यांच्या इशाऱ्यावरून विरोधात बोलणाऱ्या नेत्यांवर कारवाई करते असा आरोप सतत होत आलाय. मुंबई सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने मोहित कंबोज यांना बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेकडे तीन पाठवण्यात अर्ज करण्याच्या निर्देश दिला आहे .. त्याच बरोबर निर्धारित वेळेत जर मोहित कंबोज यांनी मनपाकडे अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज केला तर त्यावर दोन आठवण्यात  नियमाप्रमाणे मनपा निर्णय देणार ..त्याच बरोबर जर  महापालिकेचा निर्णय कंबोज यांच्या विरोधात गेला तर  दोन आठवणे मनपाने कुठलीही कारवाई करू नये असं ही निर्देश कोर्टाने दिला आहे .

प्रकरणात नेमका निर्णय काय होणार?

 या प्रकरणात पुढील सुनावणी 11 ऑगस्ट रोजी होणार आहे .. कंबोज यांच्या खार स्थित घरामध्ये अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी मुंबई महानगरपालिका तर्फे तोडक कारवाई करण्याबाबत काही दिवसांपूर्वी  नोटीस दिली गेली होती ..त्या विरोधात कंबोज यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती ..त्यावर सुनावणी नंतर मुंबई सत्र न्यायालयाने आज वरील आदेश दिला आहे .