AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वर्षातला सर्वात मोठा स्फोटक आणि थेट भाग लवकरच’, ठाकरे गटाकडून सर्वात मोठे संकेत

खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची एक स्पेशल मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

'वर्षातला सर्वात मोठा स्फोटक आणि थेट भाग लवकरच', ठाकरे गटाकडून सर्वात मोठे संकेत
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jul 24, 2023 | 8:43 PM
Share

मुंबई | 24 जुलै 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. या व्हिडीओचा प्रोमो ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये वर्षातला सर्वात मोठा स्फोटक आणि थेट भाग लवकरच असं म्हटलं आहे. तसेच या व्हिडीओ उद्धव ठाकरे आपली रोखठोक भूमिका मांडताना दिसत आहेत.

आवाज महाराष्ट्राच्या कुटुबप्रमुखाचा असा उल्लेख या प्रोमोत करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत 26 आणि 27 जुलैला सकाळी 8 वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आवाज कुणाच्या या पॉडकास्टसाठी उद्धव ठाकरेंची ही मुलाखत घेण्यात आलीय.

या मुलाखतीतलं संभाषण जसंच्या तसं

संजय राऊत : वर्षभरापूर्वी अशाच मुसळधार पावसामध्ये तुमच्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं होतं.

उद्धव ठाकरे : वाहून नव्हतं गेलं, खेकड्यांनी धरण फोडलं होतं.

संजय राऊत : ते असं म्हणत आहेत, देवेंद्र फडणवीस की, उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला

उद्धव ठाकरे : मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की जेणेकरुन तुम्ही राष्ट्रवादी तोडली? उठसूट दिल्लीला मुजरा मार ही आपली संस्कृती नाहीय.

संजय राऊत : लोकशाही वाचणवणार का?

उद्धव ठाकरे : लोकशाही साधा माणूस वाचवणार.

‘राम मंदिराचं श्रेय कसं घेऊ शकता?’

“बाबरीच्या वेळेला जबाबदारी घ्यायला नव्हता. राम मंदिराचा निर्णय तुम्ही घेतला नाही. मग राम मंदिराचं श्रेय कसं घेऊ शकता?”, असा सवाल उद्धव ठाकरे या मुलाखतीत भाजपला करताना दिसत आहेत. “देशावर जो प्रेम करतो. देशासाठी जो मरायला तयार आहे तो हिंदू आहे. माझा देश माझा परिवार आहे हे माझं हिंदुत्व”, असंही ते म्हणाले आहेत.

‘उद्धव ठाकरेची भीती का वाटते?’

“माझ्याविरोधात आज आख्ख भाजप आहे. तरीदेखील तुम्हाला उद्धव ठाकरेची भीती का वाटते? उद्धव ठाकरे एकटा व्यक्ती नाहीय. उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हाणाले. “मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर संपवा. बघू ना मग, माझ्या वडिलांचा आशीर्वाद, माझ्या जनतेची सगळी साथ सोबत आणि तुमची ताकद”, असं उद्धव ठाकरे मला म्हणाले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?