
आशियातील सर्वाधिक श्रीमंत असलेले मुकेश अंबानी कायम चर्चेत असतात. भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी मुंबईतील त्यांच्या अल्मा मॅटर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) ला 515 कोटी रुपयांची सर्वात मोठी देणगी दिली आहे. मुकेश अंबानी यांनी 1970 मध्ये याच संस्थेतून शिक्षण घेतलं होतं. संस्थेला पूर्वी यूनिवर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी (UDCT) असं नाव होतं. यूडीसीटीची स्थापना 1933 मध्ये मुंबई विद्यापीठाने केली. 2008 मध्ये त्याच संस्थेचं नाव आयसीटी असं ठेवण्यात आलं आणि ते डीम्ड युनिव्हर्सिटी बनलं.
सांगायचं झालं तर, लेखीका अनिता पाटील यांनी लिहिलेल्या ‘द डिव्हाईन सायंटिस्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान अंबानी यांनी आयसीटीला ही देणगी जाहीर केली. हे पुस्तक पद्मविभूषण प्राध्यापक मनमोहन शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांना भारतीय रासायनिक अभियांत्रिकीचे एक महान गुरू मानले जाते.
गुरु दक्षिणेच्या परंपरेनुसार, प्राध्यापक शर्मा यांच्या सूचनेनुसार अंबानी यांनी आयसीटीला 151 कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मुकेश अंबानी म्हणाले, ‘ते (मनमोहन शर्मा) आम्हाला जे काही सांगतात ते आम्ही ऐकतो. त्यांनी मला सांगितलं मुकेश तुम्हाला ICT साठी काहीतरी मोठं करावं लागणार आहे. त्यामुळे मला जाहिर करण्यास आनंद होत आहे की, मी हे दान प्राध्यापक मनमोहन शर्मा यांच्यासाठी करत आहे.’
अंबानी यांनी यूडीसीटी कॅम्पसमध्ये पोहोचणं हा एक पवित्र अनुभव असल्याचं सांगितलं आणि प्रोफेसर शर्मा यांना त्यांचे सर्वात आदरणीय शिक्षक, मार्गदर्शक आणि प्रेरणेचे स्रोत म्हटलं. अनिता पाटील यांचे कौतुक करताना मुकेश अंबान म्हणाले, अशा महान व्यक्तीचे जीवन लिहिणे सोपे काम नाही.
मुकेश अंबानी यांनी आयआयटी बॉम्बेपेक्षा यूडीसीटी निवडल्याची आठवण करून दिली. ते म्हणाले की, प्रोफेसर शर्मा यांचे पहिले व्याख्यान ऐकल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला. मुकेश अंबानी म्हणाले, ‘मला वाटलं की ते फक्त धातूंचेच नाही तर मनाचाही तज्ज्ञ आहे. मुकेश अंबानी यांनी भारतीय रासायनिक उद्योगाच्या विकासाचे श्रेय प्राध्यापक शर्मा यांना दिले आणि त्यांना राष्ट्रगुरू म्हटले.