मुंबईतील खासगी रुग्णालयांसह नर्सिंग होम कोरोनामुक्त, 70 रुग्णालयात पावसाळी आजारांवर उपचार

| Updated on: Aug 20, 2020 | 10:00 PM

मुंबईवर असलेले कोरोनाचे संकट कमी होताना पावसाळी आजारांचे प्रमाण वाढत (Mumbai Hospital Corona Free get treatment of malaria dengue disease) आहे.

मुंबईतील खासगी रुग्णालयांसह नर्सिंग होम कोरोनामुक्त, 70 रुग्णालयात पावसाळी आजारांवर उपचार
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर असलेले कोरोनाचे संकट कमी होताना पावसाळी आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील खासगी रुग्णालयांसह उपनगरांमधील छोटी नर्सिंग होममध्ये कोरोनामुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबईतील 70 रुग्णालयात इतर संसर्गजन्य आजारांवर उपचार केले जाणार आहे. (Mumbai Hospital Corona Free get treatment of malaria dengue disease)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालिकेने खासगी रुग्णालयांसह उपनगरांमधील छोटी नर्सिग होम, रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण दाखल करण्यासंदर्भात निर्देश दिले होते. मात्र पावसाळी आजारांचे आव्हान लक्षात घेता ही रुग्णालय नॉनकोव्हिड करण्यात येणार आहेत.

या रुग्णालयातून शेवटचा रुग्ण घरी गेल्यानंतर कोरोनाव्यक्तिरिक्त इतर आजारांसाठी ती खुली केली जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस यासह इतर संसर्गजन्य रोगांचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी जून आणि जुलै महिन्यांमध्ये मलेरियाची रुग्णसंख्या गेल्यावर्षीच्या तुलनेने दुप्पट होत असते. यंदाही जुलैमध्ये मलेरिया रुग्णांचा आकडा दुप्पट झाला आहे. तसेच यंदा दोन जणांचा मलेरियाने मृत्यू झाला आहे. शिवाय कोरोनाचं संकटही पूर्णपणे ओसरलेलं नाही. त्यामुळे पालिकेने सुरु केलेल्या नियंत्रण कक्षामार्फत शहराच्या प्रत्येक प्रभागात छोट्या रुग्णालयांसह नर्सिंग होममध्येही कोरोनाचे रुग्ण दाखल करण्यात आले होते.

मात्र कोरोना रुग्णांची संख्या आता नियंत्रणात आली आहे. त्यामुळे नव्या रुग्णांना मोठ्या रुग्णालयांसह जम्बो सुविधा, कोरोना काळजी कक्षाची उपलब्धता असणार आहे.  (Mumbai Hospital Corona Free get treatment of malaria dengue disease)

संबंधित बातम्या : 

कोरोना पाठोपाठ मुंबईवर आता ‘या’ आजाराचं संकट, दोघांचा मृत्यू

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तिसरे तलाव ओव्हरफ्लो, धरणांमध्ये 82.95 टक्के पाणीसाठा

मुंबईत 20 वॉर्डमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षा कमी, कुठे काय स्थिती?