Mumbai Accident : आलिशान रेंज रोव्हरचा गेट वे ऑफ इंडियाजवळ अपघात! सुदैवानं अनर्थ टळला

धडकेमध्ये दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. लँड रोव्हर कारचा मागील तर KWID कारचा पुढील भाग तुटला आहे. दोन्ही कारमध्ये अपघाताच्या वेळी किती लोक होते आणि या कार नेमक्या कोणाच्या आहेत. याबद्दल अद्याप काही माहिती मिळू शकली नाहीये. लँड रोव्हर कार क्रमांक MH 04 GE 1973 आहे आणि KWID कार क्रमांक JH 1EG 6648 आहे.

Mumbai Accident : आलिशान रेंज रोव्हरचा गेट वे ऑफ इंडियाजवळ अपघात! सुदैवानं अनर्थ टळला
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 11, 2022 | 10:08 AM

मुंबई : मुंबईमध्ये (Mumbai) आज सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू आहे. मस्त थंडगार वातावरण मुंबईचे झाले असून उकाड्यापासून आराम मुंबईकरांना मिळालाय. मात्र, आज सकाळी या पावसामध्ये मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथे दोन लग्जरी कारमध्ये धडक झालीये. यामध्ये दोन्ही कारचे मोठे नुकसान (Damage) झाले. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नसल्याची देखील माहिती मिळते आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ पार्क केलेली ही कार लँड रोव्हर आणि KWID आहे. या धडकेमध्ये लँड रोव्हर कारचा मागील भाग तुटून मोठे नुकसान झाले. या अपघातामध्ये (Accident) KWID कारचा पुढचा भाग देखील तुटलाय.

धडकेमध्ये दोन्ही कारचे मोठे नुकसान

धडकेमध्ये दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. लँड रोव्हर कारचा मागील तर KWID कारचा पुढील भाग तुटला आहे. दोन्ही कारमध्ये अपघाताच्या वेळी किती लोक होते आणि या कार नेमक्या कोणाच्या आहेत. याबद्दल अद्याप काही माहिती मिळू शकली नाहीये. लँड रोव्हर कार क्रमांक MH 04 GE 1973 आहे आणि KWID कार क्रमांक JH 1EG 6648 आहे. धडकेनंतर गुन्हा वगैरे दाखल झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळू शकली नाहीये. मात्र, अपघात झालेल्या कार बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झालीये.

सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाला सुरूवात

सकाळपासून मुंबईमध्ये थंड वाऱ्यासह पाऊस पडत आहे. यामुळे सकाळी सकाळी थंड वातावरणामध्ये फिरण्यासाठी आणि वाॅकिंगसाठी मुंबईकर घराबाहेर पडत आहेत. अगोदर कर्नाटकाच्या कारवारमध्ये मान्सूम दाखल झाला आणि त्यानंतर गोवा मग कोकणामध्ये मान्सूम दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हामध्ये देखील मान्सून जोरदार बरसला. पुढील काही दिवसांमध्ये मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून जोरदार बरसणार असल्याचे सांगितले जात आहे. असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.