Video : मातोश्री बंगल्याशेजारी कलानगरच्या रस्त्यावर ‘खुंखार’ अजगर! रस्ता ओलांडून थेट गटारात घुसला

Mumbai Bandra Python : हायवेवरुन रस्ता ओलांडून जात एका ड्रेनेजच्या पाईपलाईनमध्ये हा अजगर घुसला होता.

Video : मातोश्री बंगल्याशेजारी कलानगरच्या रस्त्यावर 'खुंखार' अजगर! रस्ता ओलांडून थेट गटारात घुसला
वांद्रेत आढळला अजगरImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 8:29 AM

मुंबई : गावच्या हायवेवर, गावातल्या रस्त्यांवर रात्री, अपरात्री नव्हे तर दिवसाही सरपटणारे प्राणी दिसणं, ही सामान्य गोष्ट आहे. पण शहरात जर असं घडलं, तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मुंबईच्या (Mumbai News) रस्त्यावर तर असं क्वचितच घडलं. म्हणून सरपटणारा एका अवाढव्य प्राणी दिसला, की लगेच त्याचे व्हिडीओ (Snake Video) काढण्यासाठी मुंबईकरांचे मोबाईल सज्ज होतात. आता तर मुंबईच्या रस्त्यावर चक्क अजगर आढळून आलाय. रस्ता ओलांडत हा अजगर (Python in Mumbai) एक ड्रेनेजच्या पाईपलाईनमध्येही घुसला. याबाबत माहितीम मिळाल्यानंतर तातडीनं लोकांनी सर्पमित्रांना कळवलं आणि या अजगराला गटाराच्या ड्रेनेज लाईनमधून बाहेरही काढलं. त्यानंतर या अजगराला वनविभागाकडे सुपूर्ददेखील करण्यात आलं. चकीत करणारी गोष्ट म्हणजे ही सगळी घटना घडली, अगदी मातोश्रीच्या शेजारी…

फ्लायओव्हरखाली अजगर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व येथील मातोश्री बंगल्याच्या शेजारी कलानगर इथं एक उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या हायवेच्या रस्त्यावरच एक सरपटणारा प्राणी असल्याचं दिसून आलं.

थोडं पुढे गेल्यानंतर चक्क अजगर असल्याचं कळलं. त्यानंतर एकच घाबरगुंडी उडाली होती. हायवेवरुन रस्ता ओलांडून जात एका ड्रेनेजच्या पाईपलाईनमध्ये हा अजगर घुसला होता.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

सर्पमित्रांची मदत

दरम्यान, स्थानिकांनी सर्पमित्रांना याबाबतची कल्पना दिली. सर्पमित्रांनी तातडीनं कलानगर इथं धाव घेतली. सर्पमित्र अतुल कांबळे आणि सूरज मोरे यांनी ड्रेनेजमध्ये घुसलेल्या सर्पाला बाहेर काढलं आणि त्यानंतर या अजगराला वनविभागाकडे सुपूर्द केलं. फोन करुन अतुल कांबळे या सर्पमित्राला याबाबती माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांना लगेचच कलानगरच्या दिशेने धाव घेतली.

.. पण तो नेमका आला कुठून?

आता या अजगराला जीवदान देण्यात आलं असून सर्पमित्रामुळे या अजगराचाही जीव वाचलाय. शिवाय लोकांचाही जीव भांड्यात पडला. चक्क अजगर रस्त्यावर आढळून आल्याचं कळल्यानंतर कलानगर भागातील लोकांमध्ये या अजगराचे व्हिडीओ व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते. दरम्यान हा अजगर सरपटक नेमका आला कुठून असावा, यावरुन आता तर्क वितर्कांना उधाण आलंय.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.