AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेत मोठी खेळी, उद्धव ठाकरेंकडून वाद मिटवण्यासाठी पहिलं पाऊल, नवा प्रस्ताव काय?

मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदावरून ठाकरे गट आणि मनसेमध्ये सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी मोठी हालचाल सुरू आहे. मनसेची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे गटाने प्रभाग समिती अध्यक्षपदाचा नवा प्रस्ताव दिला असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली आहे.

मुंबई महापालिकेत मोठी खेळी, उद्धव ठाकरेंकडून वाद मिटवण्यासाठी पहिलं पाऊल, नवा प्रस्ताव काय?
Uddhav Thackeray Raj Thackeray
| Updated on: Feb 22, 2026 | 12:46 PM
Share

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. आता हाच वाद मिटवण्यासाठी ठाकरे गटाकडून महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे गटाकडून मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाने मनसेला याबद्दलचा प्रस्ताव दिल्याचे बोललं जात आहे. सध्या यावर चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांवरुन ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगली आहे. आता हीच नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे गटाने एक मोठी खेळी खेळली आहे. ठाकरे गटाने मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव दिला आहे. या नव्या प्रस्तावावर आणि दोन्ही पक्षांतील समन्वयावर सध्या मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. ही चर्चा करण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आणि ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांच्यात महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर स्वीकृत नगरसेवक पदावरून निर्माण झालेला पेच सुटणार की नाही, या प्रस्तावाला मनसेकडून होकार मिळणार की नाही, याबद्दलची माहिती समोर येणार आहे.

नेमका वाद काय?

मुंबई महापालिकेत ठाकरे गटाने आपल्या कोट्यातील 3 स्वीकृत नगरसेवकांची नावे प्रशासनाकडे सादर केली आहेत. मात्र, यामध्ये मनसेला स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे मनसेकडून वारंवार युती धर्म पाळला गेला नसल्याची टीका ठाकरे गटांवर केली जात आहे. कोत्या मनोवृत्तीची माणसं असा घणाघातही मनसेने केला आहे. याबद्दल मनसेने वारंवार आपली नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आता प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या ऑफरने ही दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या वादावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. महापालिकेचे राजकारण वेगळे असते. मी वैयक्तिकरित्या या प्रक्रियेत पडत नाही, पण आमची युती आजही टिकून आहे. अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेतृत्व घेईल, असे सांगत त्यांनी वादावर थेट भाष्य करणे टाळले आहे. दरम्यान आता याप्रकरणी मनसे काय निर्णय घेणार, ठाकरेंच्या प्रस्तावावर होकार कळवणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...