बहुमजली इमारती मुंबई महापालिकेच्या रडारवर, फायर फायटिंग सिस्टीम यंत्रणेची कसून तपासणी

| Updated on: Oct 23, 2021 | 8:50 AM

मुंबईतील बहुमजली इमारतींच्या पुन्हा अग्निप्रतिबंधक यंत्रणेची कसून तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अग्निप्रतिबंधक यंत्रणेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या सोसायटय़ांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.

बहुमजली इमारती मुंबई महापालिकेच्या रडारवर, फायर फायटिंग सिस्टीम यंत्रणेची कसून तपासणी
avighna park Fire photo
Follow us on

मुंबई: मुंबईतील करी रोड रेल्वे स्टेशन जवळील 60 मजली वन अविघ्न पार्क इमारतीला लागलेल्या आगीतनंतर मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. वन अविघ्न पार्कमध्ये लागलेल्या आगीमध्ये एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. अग्निसुरक्षा यंत्रणा बहुमजली इमारतींमध्ये कार्यरत आहे की नाही याचा शोध महापालिका घेणार आहे. करी रोड परिसरातील ‘वन अविघ्न पार्क’ इमारतीच्या १९व्या मजल्यावर लागलेल्या आगीच्या घटनेमुळे मुंबईतील बहुमजली इमारती पालिकेच्या रडारवर आल्या आहेत.

अग्निप्रतिबंधक यंत्रणेची कसून तपासणी

मुंबईतील बहुमजली इमारतींच्या पुन्हा अग्निप्रतिबंधक यंत्रणेची कसून तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अग्निप्रतिबंधक यंत्रणेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या सोसायटय़ांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.

मुंबई महापालिका कारवाई करणार

महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवरक्षक उपाययोजना कायदा २००६’अन्वये बहुमजली इमारतीत अग्निप्रतिबंधक यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे. त्यामुळे ही यंत्रणा न उभारणाऱ्या सोसायटय़ांविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार खटला दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मुंबईतील बहुमजली इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा आढावा घेऊन निष्काळजी सोसायटय़ांची यादी तयार करण्यात येणार आहे.

दोषींवर कारवाई करणार

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अविघ्न इमारतीच्या 19 व्या आणि 20 व्या मजल्यावर लागलेल्या आगीला दोषी असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. घटनास्थळी काहीच मिनिटांमध्ये महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले. आग विझवण्यावर आणि रहिवाशांच्या सुटकेवर जास्तीत जास्त भर दिला. याप्रकरणी जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करणार असून अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणारच, कुणालाही अभय नाही. आगीची संपूर्ण चौकशी केली जाईल, चौकशीनंतर दोषींवर कारवाई करु, असं आश्वासन बीएमसी आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिलं.

इतर बातम्या:

आगीचे लोट दिसले अन् आम्ही धावतपळतच खाली आलो; अविघ्न पार्कच्या रहिवाश्यांनी सांगितली आँखो देखी!

VIDEO | श्रीमंतांची सोसायटी, मुंबईच्या छाताडावर उभी, सर्व सोयींनी सुसज्ज, पण आग लागलीच कशी?

Mumbai BMC will take strict action against high rise building lack of fire safety system decision taken after Avighna fire