VIDEO | श्रीमंतांची सोसायटी, मुंबईच्या छाताडावर उभी, सर्व सोयींनी सुसज्ज, पण आग लागलीच कशी?

मोठी हायप्रोफाईल सोसायटी आहे. सर्व सुरक्षा यंत्रणा बसवली आहे मात्र ती चालू नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय कुठल्याही अधिकृतवाल्यांना आम्ही वाचवणार नाही. इथल्या मॅनेजमेंट आणि फायर सिक्युरिटीवर कारवाई होणार असे महापौरांनी स्पष्ट केले.

VIDEO | श्रीमंतांची सोसायटी, मुंबईच्या छाताडावर उभी, सर्व सोयींनी सुसज्ज, पण आग लागलीच कशी?
श्रीमंतांची सोसायटी, मुंबईच्या छाताडावर उभी, सर्व सोयींनी सुसज्ज, पण आग लागलीच कशी?


मुंबई : करी रोड येथील अविघ्न पार्क या हायप्रोफाईल इमारतीला आग लागली. या इमारतीत सर्व सुसज्ज फायर यंत्रणा असूनही आगीने रौद्र रुप धारण केले. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी आढावा घेतला आहे. अग्निशमन दलाचे लोक शिडी लावून चढेपर्यंत अरुण तिवारीचा हात खाली निसटला आणि तो खाली पडला. बहुतेक 19 व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं. यातून आग लागल्याची माहिती आहे. सोसायटीतले लोक सांगतायत त्यांची वॉटर सिस्टम चालू नव्हती. दरवेळी महापालिका काय करेल, सगळ्या सिस्टम आहेत. पण सिस्टम वर्किगमध्ये ठेवलं नाही. इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते प्रथमदर्शनी दोषी दिसतायत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे महापौर म्हणाल्या. (Know out the cause of the fire in a well-equipped building)

महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय सांगितलं?

धुरामध्ये 2 जण अडकल्याची माहिती मिळतेय. लेवल 4 ची आग आहे. सिक्युरिटी कर्मचाऱ्यांकडे 15 मिनिटे होती. राम तिवारी नामक व्यक्तीचे जीव वाचवू शकले असते. प्रसंगावधान राखत गाद्या घालून, चादरी लावल्या असत्या तर त्याला वाचवता आलं असतं. सोसायटची वॉटर सिस्टम चालू नव्हती. मोठी हायप्रोफाईल सोसायटी आहे. सर्व सुरक्षा यंत्रणा बसवली आहे मात्र ती चालू नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय कुठल्याही अधिकृतवाल्यांना आम्ही वाचवणार नाही. इथल्या मॅनेजमेंट आणि फायर सिक्युरिटीवर कारवाई होणार असे महापौरांनी स्पष्ट केले.

आगीत किती लोक जखमी झाले याची अद्याप माहिती मिळाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच दहाव्या मिनिटाला आम्ही पोहोचलो आहे. इथे एक व्यक्ती लटकत होती. ही अविघ्न पार्क म्हणजे फार मोठी हायप्रोफाईल सोसायटी आहे. आणि हायप्रोफाईल सोसायटीमध्ये 200 च्या वर सिक्युरिटी गार्ड आणि सुरक्षा कर्मचारी आहेत. तो व्यक्ती हात पकडून वर लटकत होता, त्याला वाचवण्यासाठी ट्रेनिंग पाहिजे होतं ते मला दिसलं नाही. त्यांनी लगेच गाद्या घातल्या असत्या, लगेच मोठ्या प्रमाणावर चादरी घातल्या असत्या त्याला कँच करण्यासाठी तर त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणावर इन्जुरी झाली नसती, असेही महापौरांनी सांगितले.

जीव वाचवताना हात सुटून रहिवासी थेट खाली कोसळला

मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. आगीनंतर इमारतीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा एक रहिवासी बाहेर लटकत होता, मात्र यावेळी तो उंचावरुन खाली पडल्याची दृश्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.

इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना एक जण इमारतीच्या बाल्कनीत गेला. मात्र जीव वाचवण्याच्या नादात हात सुटून तो रहिवासी थेट खाली कोसळल्याची माहिती आहे. संबंधित व्यक्ती जखमी झाल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं. मात्र त्याच्याविषयी अद्याप अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही

नेमकं काय घडलं?

करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी माहिती अद्याप समोर आलेलं नाही. (Know out the cause of the fire in a well-equipped building)

इतर बातम्या

डोळे गरगरायला लावणाऱ्या 60 मजली वन अविघ्न पार्कला आग, जाणून घ्या इमारतीबद्दलची संपूर्ण माहिती

अविघ्न पार्क आग : इमारतीत तैनात सिक्युरिटी गार्ड आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे बचावाचं ट्रेनिंग नाही; महापौर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI