AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आगीचे लोट दिसले अन् आम्ही धावतपळतच खाली आलो; अविघ्न पार्कच्या रहिवाश्यांनी सांगितली आँखो देखी!

आग लागली तेव्हा आम्ही घरात होतो. पण धुराचे लोट पसरल्याने काही तरी जळाल्यासारखा वास आला. ही दुर्गंधी अधिकच वाढल्याने आम्ही खिडकी आणि दरवाजा उघडून पाहिल्यानंतर आमच्याच सोसायटीला आग लागल्याचे दिसले. (Massive fire at 60-storey Avighna Park residential building in curry road)

आगीचे लोट दिसले अन् आम्ही धावतपळतच खाली आलो; अविघ्न पार्कच्या रहिवाश्यांनी सांगितली आँखो देखी!
Avighna Park residential building
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 1:35 PM
Share

मुंबई: आग लागली तेव्हा आम्ही घरात होतो. पण धुराचे लोट पसरल्याने काही तरी जळाल्यासारखा वास आला. ही दुर्गंधी अधिकच वाढल्याने आम्ही खिडकी आणि दरवाजा उघडून पाहिल्यानंतर आमच्याच सोसायटीला आग लागल्याचे दिसले. धुराच्या लोटाने परिसर काळवंडून गेला होता. हे दृश्य पाहून काळजात धस्स झालं अन् आम्ही आहे त्या अवस्थेत घरातून तात्काळ बाहेर धाव घेतली… करीरोडच्या अविघ्न पार्क सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीने आँखो देखी सांगितली. हे सांगतानाच त्याला प्रचंड धाप लागली होती.

करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी माहिती अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, आग लागल्याने इमारतीतील रहिवासी मात्र भयभीत झाले आहेत.

आग लागताच खाली उतरले

आमच्या सोसायटीतील 19 मजल्यावर आग आगली. मी रहायला 20 व्या मजल्यावर आहे. मला जसंही आगीचे लोट दिसले, तसंही मी लगोलग खाली उतरले. इतरांनाही आगीची माहिती दिली. आगीची भीषणता खूपच होती. माझ्या माहितीप्रमाणे 19 व्या मजल्यावर कुठेतरी फर्निचरचं काम सुरु होतं. त्यामुळे आग लागली असेल. परंतु बिल्डिंगमध्ये ऑटोमॅटिक फायर सिस्टम आहे. रहिवासी इमारत असल्याने नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु रेस्क्यू ऑपरेशन जवळपास पूर्ण झालेलं हे. नागरिक अडकल्याची भीती राहिलेली नाही, असं एका महिलेने सांगितलं.

भगवान की दया से सब ठिक होगा

एक तासापूर्वीच आग लागली. मी 18 व्या मजल्यावर राहतो. आग कशामुळे लागली काही माहीत नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असं सांगितलं जातंय. लोक फसलेले नाही. लोक लॉबीत आले आहेत. नगरसेवक, आमदार, महापौर सर्व आले आहेत. काही टेन्शन नाही. भगवान की दया से सब ठिक होगा, असं दुसऱ्या रहिवाश्याने सांगितलं. तसेच इमारतीत अॅटोमॅटिक फायर सिस्टीम असल्याचंही त्यांनी सांगितलं. 19व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरू होतं. त्यामुळेही आग लागली असावी, असंही या रहिवाश्याने सांगितलं.

वृद्धांना कसं तरी बाहेर आणलं

मी 28व्या मजल्यावर राहते. बेलच्या मेन स्वीचमध्ये काही प्रॉब्लेम झाल्याने आग लागली असावी. ज्यांच्या घरात आग लागली ते लोक दहा दिवसांपूर्वीच इथे राहायला आले आहेत. सर्व सेफ आहेत. कोणीही फसलेले नाही, असं या इमारतीतील एका तरुणीने सांगितलं. मी चालत आले. आग लागली तेव्हा मी 20व्या मजल्यावर होते. आता सर्व इमारत खाली करण्यात आली आहे. वृद्धांना व्हिलचेअरवरून आणलं. काहींना उचलून आणलं असंही या रहिवाश्यांनी सांगितलं.

शॉर्ट सर्किटमुळे आग

19व्या मजल्यावर आग लागली. पण पाचव्या मजल्यावर आधी आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. आग नियंत्रणात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवान पोहोचले आहेत. लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, असं स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Mumbai Avighna Tower Fire Live | मुंबईत करी रोड भागात अविघ्न टॉवरमध्ये आग, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी

EXCLUSIVE VIDEO | मुंबईत अविघ्न टॉवरमध्ये आग, जीव वाचवताना हात सुटला, खाली पडून रहिवाशाचा मृत्यू

61 मजल्यांचे दुहेरी टॉवर्स, अलिशान फ्लॅटस, वन अविघ्न पार्कविषयी जाणून घ्या सर्वकाही

(Massive fire at 60-storey Avighna Park residential building in curry road)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.