Mumbai Corona Vaccination | लहान मुलांच्या लसीकरणासाठी जम्बो व्हॅक्सिनेशन सेंटर, मुलांना बसण्याची सोय, चॉकलेटही मिळणार

| Updated on: Jan 01, 2022 | 1:36 PM

लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई मनपाने आगावीची तयारी केली आहे. शहरातील बीकेसी येथे जंबो व्हॅक्सिनेशन सेंटर उभारण्यात आले असून येथे 15-18 या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

Mumbai Corona Vaccination | लहान मुलांच्या लसीकरणासाठी जम्बो व्हॅक्सिनेशन सेंटर, मुलांना बसण्याची सोय, चॉकलेटही मिळणार
vaccination
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे ढग गडद झाले आहेत. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले आहे. राजधानी मुंबईच्या प्रशासनाकडूनदेखील खरबदारी म्हणून वेगवेगळ्या उपायोजना केल्या जात आहे. तसेच लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई मनपाने आगावीची तयारी केली आहे. शहरातील बीकेसी येथे जंबो व्हॅक्सिनेशन सेंटर उभारण्यात आले असून येथे 15-18 या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

मुलांना बसण्याची विशेष सोय , चकलेटही मिळणार

येत्या तीन जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने आपली तयारी पूर्ण केली आहे. येथे लहान मुलांसाठी व्हॅक्सिनेशन सेंटर उभे करण्यात आले आहेत. या लसीकरण केंद्रांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळत मुलांना लस दिली जाणार आहे. मुंबईतील बीकेसी जंबो व्हॅक्सिनेशन सेंटरमध्ये लहान मुलांना बसण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. तसेच मुलांना डोस दिल्यानंतर त्यांना चॉकलेटदेखील दिले जाईल. या सर्व तयारीचा आढावा पालिकेचे डीएमसी मसुरकर यांनी घेतलाय.

9 जम्बो करोना केंद्रात लसीकरणाची सुविधा

मुंबई पालिकेकडून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मोहीम 3 जानेवारीपासून राबविली जाणार आहे. मुंबईतील 9 जम्बो करोना केंद्रात लसीकरणाची सुविधा पुरविण्यात आली आहे. 2007 या साली किंवा त्यापूर्वी जन्म झालेल्या मुलांना याचा लाभ घेता येईल. यासाठी शनिवार 1 जानेवारीपासून ऑनलाईन नाव नोंदणीस प्रारंभ झाला आहे. तर ऑफलाईन पद्धतीनेदेखील मुलांना डोस दिले जाणार आहेत.

आजपासून नावनोंदणीस सुरुवात

दरम्यान, आजपासून लहान मुलांच्या लसीकरणासाठीच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे.  https://www.cowin.gov.in या वेबसाईटवर जाऊन नावनोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येते. प्रत्यक्ष लसीकरणाला येत्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी शनिवारपासूनच लसीकरण नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात करण्यात आलीय. 15 ते 18 या वयोगटातील मुलांचे आधारकारर्ड तसेच आधारकार्ड नसेल तर शाळेतील ओळखपत्राच्या मदतीने मुलांचे लसीसाठी नाव नोंदवता येते. कोवीन या वेबसाईटवर गेल्यानंतर अॅड मोअर या बटनावर क्लिक करुन एका मोबाईल क्रमांकाच्या मदतीने चार मुलांच्या लसीकरणाची नोंद केली जाऊ शकते.

इतर बातम्या :

नववर्षाची सुरवात शेतकरी हीताच्या निर्णयाने : पीएम किसानचा हप्ता जारी, अन् शेतकरी उत्पादक कंपन्यांना 14 हजार कोटी

पैशांसाठी नातवानेच रचला कट, दरोडेखोरांना दिली आजोबांची टीप; पनवेलमधील 27 तोळे दागीन्यांच्या लुटीचे रहस्य उलगडले

रायगडमध्ये महिला सरपंचाची हत्या, ‘ऑस्कर’नं वास घेत आरोपीला पकडलं, वाचा संपूर्ण घटनाक्रम