नववर्षाची सुरवात शेतकरी हीताच्या निर्णयाने : पीएम किसानचा हप्ता जारी, अन् शेतकरी उत्पादक कंपन्यांना 14 हजार कोटी

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता ठरल्याप्रमाणे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील 10 कोटी 90 लाख शेतकऱ्यांच्या खत्यावर जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. एवढेच नाही तर शेतकरी उत्पादक कंपन्याना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी 1 लाख 24 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

नववर्षाची सुरवात शेतकरी हीताच्या निर्णयाने : पीएम किसानचा हप्ता जारी, अन् शेतकरी उत्पादक कंपन्यांना 14 हजार कोटी
संग्रहीत छायाचित्र
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 01, 2022 | 1:36 PM

मुंबई : पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता ठरल्याप्रमाणे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील 10 कोटी 90 लाख शेतकऱ्यांच्या खत्यावर जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. एवढेच नाही तर शेतकरी उत्पादक कंपन्याना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी 1 लाख 24 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या हीताचा निर्णय घेण्यात आल्याने आता वर्षभर योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हीतच साधले जाणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे.

म्हणून किसान सन्मान योजना लागू

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. मात्र, हे करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावखेड्यातील तळागळातील शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर पायाभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यानुसारच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी हाच उद्देश ठेवून ही योजना सुरु करण्यात आल्याचे केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे. देशात 86 टक्के अल्पभुधारक शेतकरी आहेत. त्यांची प्रगती झाली तरच देशाची आणि शेतीची प्रगती होणार असल्याचे यावेळी सागंण्यात आले.

राज्यातील 1 कोटी 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

केंद्र सरकारच्या वतीने ही योजना राबवली जात असून देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. मध्यंतरी यामध्ये अनियमितता आढळून आल्याने कर भरुनही लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम परत घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 1 कोटी 5 लाख शेतकऱ्यांना या निधीचा लाभ होणार आहे. त्याअनुशंगाने 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितलेले आहे.

संबंधित बातम्या :

PM Kisan Scheme Narendra Modi Live : नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार, पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार

Rabi Season | अवकाळीनंतर आता ढगाळ वातावरणाचा धोका, काय आहे उपाययोजना ?

नववर्षाचे शेतकऱ्यांना गिफ्ट अन् पंतप्रधान मोदींचा संदेशही, आज जमा होणार 10 हप्ता

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें