AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धुराचे लोट, पोलिसांची फौज, चर्चगेट स्टेशनवर आग, दुकानात नेमकं काय घडलं?

मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानकातील एका केकच्या दुकानात गुरुवारी संध्याकाळी आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

धुराचे लोट, पोलिसांची फौज, चर्चगेट स्टेशनवर आग, दुकानात नेमकं काय घडलं?
churchgate fire 1
| Updated on: Jun 05, 2025 | 7:15 PM
Share

मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानकातील एका केकच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ विनित अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे.

आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीमुळे चर्चगेट रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. ज्यामुळे स्थानकातील सबवे बंद करण्यात आला. तसेच आजूबाजूचा परिसर तातडीने रिकामी करण्यात आला. तसेच, प्रवाशांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

स्थानकात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट

मिळालेल्या माहितीनुसार, ही आग लागल्याच्या सुरुवातीला स्थानकात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता, ज्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, तातडीने पश्चिम रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. पोलीस यंत्रणाही घटनास्थळी उपस्थित होती आणि त्यांनी गर्दीचे व्यवस्थापन करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली.

पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम

या घटनेमुळे काही काळासाठी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर थोडा परिणाम झाला होता, परंतु आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे निष्पन्न झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तात्काळ उपाययोजना केल्याने मोठी दुर्घटना टळली.

पश्चिम रेल्वेचे पीआरओ काय म्हणाले?

चर्चगेट रेल्वे स्थानकातील दुकानात शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आले आहे. यावेळी सुरुवातीला मोठ्या प्रमाणात धूर आला. त्यानंतर आग लागली. या घटनेनंतर तात्काळ पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या चर्चगेट रेल्वे स्थानकातील सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ विनीत अभिषेक यांनी दिली.

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल