Heavy Rain : मुंबईकरांनो नो टेन्शन..! सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा, पाणीपुरवठा करणारे सातही तलाव ओक्केमध्येच..!

भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने 27 जूनपासूनच महापालिकेने 10 टक्के पाणी कपातीस सुरवातही केली होती. राज्यभर पावसाचा लहरीपणा सुरु असला तर मुंबईमध्ये मात्र संततधार सुरु होती. 1 जुलैपासून तर यामध्ये भरच पडली. गेल्या 13 दिवसांमध्ये पावसाने अशी काय हजेरी लावली आहे की पाणीसाठा हा 26 टक्क्यांवरच आला आहे. त्यामुळे 12 दिवसांमध्येच पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

Heavy Rain : मुंबईकरांनो नो टेन्शन..! सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा, पाणीपुरवठा करणारे सातही तलाव ओक्केमध्येच..!
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा मोडक सागर तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 10:06 AM

मुंबई : राज्यात निसर्गाचा लहरीपणा कायम असला तरी हंगामाच्या सुरवातीपासूनच वरुणराजाने (Mumbai Rain) मुंबई आणि कोकणात कृपादृष्टी दाखवली होती. त्याचाच परिणाम आता पाहवयास मिळत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही (Water in the lake ) तलावातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मोडकसागर हे तलाव तर ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे फ्रेब्रुवारीपर्यंत मुंबईकरांना आरामात (Water Supply) पाणीपुरवठा होईल अशी धरणांची स्थिती आहे. सध्या या तलावांमध्ये 8 लाख 11 हजार 522 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. तर मुंबईला दिवसाकाठी 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणी लागते. त्यामुळे फेब्रुवारी 2023 पर्यंत हा पाणीपुरवठा पुरेसा राहणार आहे. मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब असून पावसाची रिपरिप ही सुरुच आहे.

पाणी कपातही रद्द

राज्यात मान्सून सक्रीय होण्यास तसा जुलै महिना उजाडतोच. यंदाही काहीशी तशीच स्थिती निर्माण झाली होती. भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने 27 जूनपासूनच महापालिकेने 10 टक्के पाणी कपातीस सुरवातही केली होती. राज्यभर पावसाचा लहरीपणा सुरु असला तर मुंबईमध्ये मात्र संततधार सुरु होती. 1 जुलैपासून तर यामध्ये भरच पडली. गेल्या 13 दिवसांमध्ये पावसाने अशी काय हजेरी लावली आहे की पाणीसाठा हा 26 टक्क्यांवरच आला आहे. त्यामुळे 12 दिवसांमध्येच पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. सध्या तलावांमध्ये 56 टक्के पाणीसाठा आहे.

मोडक सागरात पाण्याची आवक जोमात

यंदा पावसाचा जोर काही जास्तच आहे. यापूर्वी 2021 मध्ये 22 जुलै रोजी झालेल्या पावसामध्ये हा तलाव ओसंडून वाहत होता. त्यापुर्वी 2020 मध्येही ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने तलाव भरला होता. गत काही वर्षाच्या तुलनेत यंदा कमी वेळेत अधिकचा पाऊस झाल्याने 12 जुलै रोजीच तलाव ओसंडून वाहत आहे. या तलाव क्षेत्रात हंगामाच्या सुरवातीपासून सुरु झालेला पाऊस सध्याही कायम आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये मोडक सागर हा तलाव सर्वात आगोदर भरला आहे.

हे सुद्धा वाचा

अशी आहे सात तलावातील पाणी पातळी

मुंबई शहराला सात तलावातून पाणीपुरवठा होता. या तलावातील पाणीपातळीवरुन पाणी कपात की पाणीपुरवठा हे ठरले जाते. यंदा झालेल्या पावसामुळे अप्पर वैतरणा तलावात 99 हजार 268 दशलक्ष लिटर, मोडक सागरात 1 लाख 24 हजार 974 दशलक्ष लिटर, तानसामध्ये 96 हजार 894 दशलक्ष लिटर, भातसामध्ये 3 लाख 66 हजार 113 दशलक्ष लिटर तर तुळशी तलावात 6 हजार 121 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. जो फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुरेल असा अंदाज आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.