Mumabi Rain: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; अनेक परिसरातील दुकानांमधून शिरले पाणी; वाहतूक व्यवस्था कोलमडली

या परिसरातील अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक दुकानांमधून पाणी साचले असल्याने दुकानातील साहित्य इतर ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे.

Mumabi Rain: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; अनेक परिसरातील दुकानांमधून शिरले पाणी; वाहतूक व्यवस्था कोलमडली
जोरदार पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत
Image Credit source: facebook
| Updated on: Jul 05, 2022 | 12:07 AM

मुंबईः मुंबईसह उपनगरात (Mumbai City) गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rains) पडत असल्याने परिसरातील अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दहीसर, कांदिवली, मालाड, गोरेगांव आणि अंधेरी येथील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. या पाण्याचा फटका परिसरातील अनेक नागरिकां बसला आहे. कांदिवली पूर्व येथील ठाकूर हाऊसजवळ पाणी साचले असून परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. काही परिसरात पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत (Disrupted transportation) झाली आहे.

 

दुपारनंतर जोरदार सुरूवात झालेल्या पावसामुळे दहिसरच्या आनंद नगर आणि टोल नाक्याजवळ पाणी साचले आहे. आनंदनगर परिसरातील अनेक दुकानांमध्येही पाणी शिरले आहे.

नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

त्यामुळे या परिसरातील अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक दुकानांमधून पाणी साचले असल्याने दुकानातील साहित्य इतर ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे.

वाहतूक व्यवस्था विस्कळीत

मुंबईसह उपनगरातून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दिवसभर झालेल्या पावसामुळे मालाड सबवे, अंधेरी सबवे मध्येही पाणी भरू लागले आहे. परिसरातील अनेक रस्त्यांवरून पाणी साचले असल्याने त्यातूनच वाहनधारकांना वाट काढावी लागत आहे. अनेक रस्त्यावर पाणी आल्याने नदीच रूप रस्ताना प्राप्त झाले आहे. अनेक भागात गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साठल्याने अनेक नागरिकांना त्याचा फटका बसला आहे.

उर्वरित भागातही पाणी तुंबणार

असाच पाऊस सुरू राहिल्यास लवकरच उर्वरित भागातही पाणी तुंबणार असल्याची चिन्ह दिसत आहे. परिसरातील अनेक दुकानांमधून पाणी शिरले असल्याने छोट्या मोठ्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.