AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत कोरोनाच्या आकड्यात घट, सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा सकारात्मक परिणाम

विशेष म्हणजे मुंबईत कोरोना रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. (Mumbai Corona my family my responsibility campaign Positive result)

मुंबईत कोरोनाच्या आकड्यात घट, सरकारच्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेचा सकारात्मक परिणाम
| Updated on: Nov 03, 2020 | 4:48 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत गणेशोत्सव काळात दररोज कोरोनाचे 2 हजारहून अधिक रुग्ण आढळत होते. मात्र आता त्यात कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मुंबईत कोरोना रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधीत वाढ होताना पाहायला मिळत आहे. (Mumbai Corona my family my responsibility campaign Positive result)

मुंबईत गेल्या महिनाभरापासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा हा आटोक्यात येताना दिसत आहे. तसेच या मोहिमेचा मुंबईतील झोपडपट्ट्या, सोसायटीमध्येही सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत.

राज्य सरकारच्या मोहिमेनंतर मुंबईतील परिणाम

1. मुंबईतील सक्रिय रुग्णात 29 टक्क्याने घट झाली. 2. सीलबंद इमारतीची संख्या 30 टक्के तर कंटेन्मेंट झोन 13 टक्के घट झाली आहे. 3. कोरोना संसर्गाचे प्रमाण 1.06 टक्क्यांवरुन 0.41 टकक्यांपर्यंत खाली आले आहे. 4. कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर हा 66 दिवसांवरून 171 दिवसांवर गेला आहे. 5. ऑक्टोबर महिन्याचा मृत्यू दर 2 टक्के इतका आहे. तर एकत्र मृत्यूचा दर 4.4 टक्क्यावरून 9.9 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. 6. रिक्त कोविड बेडची उपलब्धता 4 हजार 986 बेडवरुन 7 हजार 817 बेडवर गेली आहे. 7. रिक्त आयसीयू बेडची उपलब्धता आता 225 बेडवरून 561 बेडवर गेली आहे. 8. ऑगस्टमध्ये सुमारे 6500 सरासरी दैनंदिन चाचणी, सरासरी दैनंदिन चाचणी सुमारे 14000-16000 (बहुधा केवळ आरटी-पीसीआर) झाली आहे. 9. तर एकूण रुग्ण डिस्चार्ज रेट 82 वरून 89 वर गेली आहे. 10. रुग्णालयांमधील गंभीर रूग्णांची संख्या 2 टक्क्यांनी घटली आहे. 11. मुंबईत रविवारी 897 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. मात्र सोमवारी फक्त 693 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. (Mumbai Corona my family my responsibility campaign Positive result)

संबंधित बातम्या :

मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढला, तब्बल 10 दिवसात दीडशे पार

कोरोनाच्या काळात बंद उद्यानांवर मुंबई महापालिकेची 22 कोटींची उधळपट्टी

Follow Us
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..
NCP Politics : सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता शिंदेसेनेत प्रवेश करणार
दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या....
CNG Crisis : दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या लांबच लांब रांगा
पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही
NCP Merger : पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान पुण्यात राजकीय खलबतं
सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; संजय राऊतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ
Gokul Milk Price Hike : गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ होण्याची शक्यता; ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका