राज्यात कोरोनाचा कहर, मंत्रालयातील ‘या’ विभागात दोन शिफ्टमध्ये काम

| Updated on: Mar 13, 2021 | 2:29 PM

ऑफिसच्या वेळा विभागणी करा. त्याचसोबतच त्रिसूत्री पाळा,” असे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा नमूद केले होते. (Mantralaya Employee Two shift)

राज्यात कोरोनाचा कहर, मंत्रालयातील या विभागात दोन शिफ्टमध्ये काम
मंत्रालय
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील जलसंधारण विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मंत्रालयातील जलसंधारण विभागात दोन शिफ्टमध्ये काम केले जाणार आहे. (Mumbai Corona Update Mantralaya Employee working with Two shift)

मंत्रालयात दोन शिफ्टमध्ये काम

जलसंधारण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयात सामाजिक अंतराचे पालन करणे. तसेच गर्दी टाळण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासकीय कार्यालयातील उपस्थिती नियंत्रित करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मंत्रालयात येणारे अनेक कर्मचारी हे लोकल ट्रेन, बस यासारख्या सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करतात. या गर्दीत कोरोनाचा धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक कर्मचाऱ्यांनी एका शिफ्टमध्ये काम करण्यापेक्षा दोन शिफ्टमध्ये काम करण्यात येणार आहे.

या सूचनेनुसार मृद आणि जलसंधारण या प्रशासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन उपस्थितीच्या वेळेत बदल करण्यात येत आहे. त्यानुसार जलसंधारण विभागातील कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करणार आहे. यातील एक शिफ्ट ही सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंत असणार आहे. तर दुपारीची शिफ्ट ही दुपारी 12 ते रात्री 8 पर्यंत असणार आहे. यातील एक कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होमही देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून यापूर्वीच सूचना 

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाची बैठक पार पडली. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक सूचना केली होती. यात ऑफिसच्या वेळा विभागणे ही महत्त्वाची सूचना होती. दिवसभरात 24 तास असतात, जर त्या 24 तासाची विभागणी केली. ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही, त्यांच्यासाठी वर्क फॉर्म होम केलं. त्यातही आपण तुकड्या केल्या पाहिजेत. यात एक टीम ऑफिसला येईल, दुसरी बॅच वर्क फॉर्म होम करेल, असे आलटून पालटून केले. तर कारण नसताना होणारी गर्दी नियंत्रणात ठेवू शकतो. वर्क फॉर्म होम आहे. ऑफिसच्या वेळा विभागणी करा. त्याचसोबतच त्रिसूत्री पाळा,” असे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा नमूद केले होते.

माझे कुटुंब माझी जबाबदारी याप्रमाणे आता मी जबाबदार अशी एक नवी मोहिम राबवायची आहे. मी जबाबदार आहे, असे प्रत्येकाने स्वत:ला सांगायचे आहे. घराबाहेर असताना मास्क घालेन, हात धुवणार, सॅनिटायझर हे त्रिसूत्री आहे. ती आपण विसरलो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

निती आयोगाच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले? 

कोविडचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळच्या बाबतीतही पारंपरिक 10 ते 5 ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे, त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे असे मोठे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निती आयोगाच्या बैठकीत केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची सहावी बैठक पार पडली.

कल करे सो आज कर, आज करे सो अभी अशी राज्य शासनाची भूमिका आहे. कोविड काळातही राज्य शासनाने विकास थांबविला नाही. सरकारकडून आलेल्या संकटावर मात करीत आम्ही मार्ग काढत होतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. (Mumbai Corona Update Mantralaya Employee working with Two shift)

संबंधित बातम्या : 

वर्क फ्रॉम होम राबवा आणि मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबईतील ऑफिसचं काय करायचं? मुख्यमंत्र्यांची सूचना कंपन्या पाळणार?