AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान… ते येतात, वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचं सांगतात अन्… मुंबईत बड्या हॉटेलमसोर काय घडलं?

Mumbai Crime : गुन्हे शाखेच्या कक्ष-9 पथकाने स्वतःला वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून त्यांना अटक केली आहे.

सावधान... ते येतात, वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचं सांगतात अन्... मुंबईत बड्या हॉटेलमसोर काय घडलं?
Mumbai Fraud CrimeImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 27, 2026 | 6:23 PM
Share

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वतःला वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आणि बँकेकडून कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळणाऱ्या तिघांच्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष-9 पथकाने अंधेरी येथील ‘द लीला’ हॉटेल परिसरात सापळा रचून तिघांना अटक केली आहे. या आरोपींकडून बनावट शासकीय ओळखपत्रे, इतर बनावट कागदपत्रे आणि पोलिसांची पाटी लावलेली चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बनावट ओळखपत्राच्या आधारे…

गुन्हे शाखेला मिळालेल्या तक्रारीनुसार, सुमारे 54 वर्षीय मुख्य आरोपी स्वतःला वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवत होता. त्यासाठी तो बनावट शासकीय ओळखपत्राचा वापर करत होता. तसेच पोलिसांची पाटी लावलेल्या टाटा पंच कारमधून फिरत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करत होता. त्यानंतर आपल्या साथीदारांसह बँकेकडून कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन देत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

गुन्हे शाखेना सापळा रचून…

या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या कक्ष-9 ने मानवी आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून आरोपी अंधेरीतील ‘द लीला’ हॉटेल परिसरात येणार असल्याची खात्री केली. त्यानुसार 26 जूनला सापळा रचण्यात आला. या कारवाईत फक्त दहावी शिकलेला सांगलीत राहणारा मुख्य आरोपी मोहम्मद गौश इब्राहिम खतीब, कल्याण येथे राहणारा शाहिद कपाडिया, सांगलीत राहणारा मजहब खतीब अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले.

गुन्हा दाखल

तपासादरम्यान आरोपींकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासविणारी बनावट शासकीय ओळखपत्रे, इतर बनावट कागदपत्रे आणि पोलिसांची पाटी लावलेली टाटा पंच कार जप्त करण्यात आली. या प्रकरणी गुन्हे शाखेने विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, सहार पोलीस ठाण्यातही संबंधित गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

सखोल तपासाला सुरुवात

अटक करण्यात आलेल्या तिसऱ्या आरोपीविरुद्ध यापूर्वी कस्तुरबा मार्ग, साकीनाका आणि खेतवाडी पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ही टोळी यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय होती का, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष- 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या टोळीने आणखी किती नागरिकांची फसवणूक केली आहे, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप