AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रुझ ड्रग्जप्रकरणातील इतर सात जणांना जामीन मंजूर, आता सुटकेची प्रक्रिया सुरू

आर्यन खाननंतर क्रुझ ड्रग्जप्रकरणातील इतर सात जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. (Mumbai cruise drug case: 7 other gate bail)

क्रुझ ड्रग्जप्रकरणातील इतर सात जणांना जामीन मंजूर, आता सुटकेची प्रक्रिया सुरू
cruise drug case
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 1:02 PM
Share

मुंबई: आर्यन खाननंतर क्रुझ ड्रग्जप्रकरणातील इतर सात जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता या सातही जणांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू झाली आहे.

क्रुझ ड्रग्ड प्रकरणात नुपूर सतेजा, गोमीन चोप्रा, अचित कुमार, गोपाळजी आनंद, भास्कर अरोरा, मानव सिंघल आणि समीर सेहगल आदी सात जणांना अटक करण्यात आली होती. एनसीबीने या सर्वांना अटक केली होती. या सातही जणांच्या जामीन अर्जावर आज एनडीपीएस कोर्टाचे न्यायामूर्ती वैभव पाटील यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता जामिनाची ऑर्डर आल्यानंतर कायदेशीर कार्यवाही पूर्ण केल्यानंतरच त्यांची सुटका होणार आहे.

सोमवारी तुरुंगातून सुटका?

दरम्यान, या सातही जणांना जामीन मिळाला असला तरी या सातही जणांची आज तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता कमी आहे. निकालाची प्रत आल्यानंतर इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच या सातही जणांची तुरुंगातून सुटका होणार आहे. उद्या रविवार असल्याने आता या सातही जणांची सोमवारीच सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे प्रकरण?

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीतर्फे कोर्टात देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे एकूण 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या 22 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 1 लाख 33 हजार रुपये रोख सुद्धा क्रुझवर एनसीबीतर्फे करण्यात आलेल्या ड्रग्ज प्रकरणात सापडले आहेत. या प्रकरणात आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी 4 ऑक्टोबर रोजी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितलं की आर्यनवर असलेले आरोप हे जामीनपात्र आहेत, मात्र त्यांनी आर्यनला एकच दिवसाची कस्टडी एनसीबीला देण्यात यावी, असं अर्ज केला. त्यांनी आर्यनबाबत युक्तिवाद करताना कोर्टात सांगितलं की आर्यनला आयोजकांनी विशेष निमंत्रण देऊन बोलवलं होतं. त्याच्याकडे बोर्डिंग पास किंवा तिकीटही नव्हतं. त्याच बरोबर क्रुझवर बोर्डिंग करताना झालेल्या चौकशीत त्याच्याकडे काहीच सापडलेलं नव्हतं. त्यांनी दोन दिवसांऐवजी एकच दिवसाची कोठडी एनसीबीला देण्याची विनंती केली, जेणेकरून त्यांना रेग्युलर कोर्टात जाता येईल.

कोकेन, एमडी, चरस सारखे ड्रग्स

एनसीबी अधिकाऱ्यांना कोकेन, एमडी, चरस सारखे ड्रग्स पार्टीत मिळाले आहेत. त्यामुळे तपासासाठी दोन दिवसांची कस्टडी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मागितली होती. त्यामुळे या सातही जणांना जामीन मिळण्यास अडचण झाली होती. मात्र, अखेर 27 दिवसानंतर या सातही जणांना जामीन मिळाला आहे.

संबंधित बातम्या:

Aryan Khan Release From Jail Live Updates | ‘मन्नत’ची प्रतीक्षा संपली, आर्यन खान अखेर घरी परतला

Aryan Khan | शाहरुखच्या पोराची कोठडी संपणार, पुढे काय काय घडणार?

संजय दत्त ते रिया चक्रवर्ती आणि आता शाहरुखच्या पोराची केस लढणारे कोण आहेत सतीश मानशिंदे?

(Mumbai cruise drug case: 7 other gate bail)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.