AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई रेल्वेच्या ‘सीएसएमटी’ स्थानकावर काय घडले? मोटरमन, गार्ड यांचे फलाटावर कामकाज

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus: लॉबीमध्ये वातानुकूलित यंत्रणा आहे. त्यामुळे दुर्गंधी अधिकच येत होते. तसेच प्रत्येकासाठी वेगवेगळ्या कॅबिन आहे. यामुळे या ठिकाणी नियमित स्वच्छता करणे अवघड होत असते. कर्मचाऱ्यांना बसणे अवघड झाल्यानंतर सोफा आणि खुर्च्या टाकून त्या फलाटावर बस्तान बांधले. शेवटी त्या ठिकाणी स्वच्छता केल्यावर १८ मृत उंदीर निघाले.

मुंबई रेल्वेच्या 'सीएसएमटी' स्थानकावर काय घडले? मोटरमन, गार्ड यांचे फलाटावर कामकाज
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus
| Updated on: Jul 23, 2024 | 8:51 AM
Share

मुंबई लोकलचा कणा म्हणजे मोटरमन आणि गार्ड आहे. सोमवारी मोटरमन, गार्ड मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटावर बसून काम करत होते. त्यामुळे काय घडले? याची उत्सुक्ता मुंबईकरांना होती. मुंबईच्या रेल्वे नेटवर्कचे प्रमुख केंद्रसुद्धा सीएसएमटी स्थानक आहे. या ठिकाणावरुन एक्स्प्रेस आणि लोकल ट्रेनचे ऑपरेशन्स होते. परंतु त्या ठिकाणी स्वच्छता मानके राखण्यात येत नाही. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना दुर्गंधीमध्ये काम करावे लागते. सोमवारी १८ उंदीर मेल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड वास येऊ लागला. शेवटी फलाटावर बसून कर्मचाऱ्यांनी काम केले.

नेमके काय घडले?

मुंबई सीएसएमटी स्थानकावर फलाट क्रमांक तीन आणि चारवर लॉबी आहे. उपनगरीय लोकल गाड्यांच्या संचालनावर देखरेख करणाऱ्या मोटरमन आणि ट्रेन व्यवस्थापकांसाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. या ठिकाणी १८ उंदीर मृत झाले होते. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्या ठिकाणी बसून काम करणेही अवघड होते. त्यामुळे शंभरपेक्षा जास्त मोटरमन आणि गार्ड फलाटावर आले. त्यांनी त्या ठिकाणी बसून आपले काम केले. दुपारनंतर प्रशासनाकडून साफसफाईची कामे पूर्ण झाल्यानंतर ते लॉबीमध्ये जाऊन काम करु लागले.

लॉबीमध्ये वातानुकूलित यंत्रणा आहे. त्यामुळे दुर्गंधी अधिकच येत होते. तसेच प्रत्येकासाठी वेगवेगळ्या कॅबिन आहे. यामुळे या ठिकाणी नियमित स्वच्छता करणे अवघड होत असते. कर्मचाऱ्यांना बसणे अवघड झाल्यानंतर सोफा आणि खुर्च्या टाकून त्या फलाटावर बस्तान बांधले. शेवटी त्या ठिकाणी स्वच्छता केल्यावर १८ मृत उंदीर निघाले.

प्रवाशांना उत्तर देण्यात अर्धा वेळ

सीएसटीएम स्थानकावरुन रोज लाखोंच्या संख्येने प्रवाशी प्रवास करतात. त्यात उपनगर आणि एक्स्प्रेस्कमधील प्रवाशी आहेत. त्यांना मोटरमन आणि गार्ड फलाटावर दिसत होते. त्यामुळे नेमके काय झाले? असा प्रश्न त्यांना सातत्याने विचारला जात होता. फलाटावर येणारे अनेक जण प्रश्न करत होते. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यात आमचा वेळ गेल्याचे एका मोटरमनने सांगितले. मुंबई सीएसटीएम स्थानकावरील या प्रकाराची चर्चा सर्वत्र सुरु होती.

चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.