AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil : सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम…; दहीहंडी उत्सवात गौतमीच्या पाटीलच्या डान्सची चर्चा; पाहा…

Dancer Gautami Patil at Magthane Dahi Handi 2023 : मागठाण्यातील तारामती चॅरिटेबल फाऊंडेशनचकडून दहीहंडी भव्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला डान्सर गौतमी पाटील हिने हजेरी लावली आहे. पाहा...

Gautami Patil : सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम...; दहीहंडी उत्सवात गौतमीच्या पाटीलच्या डान्सची चर्चा; पाहा...
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Sep 07, 2023 | 3:59 PM
Share

मागठाणे | 07 ऑगस्ट 2023 : आज दहीहंडीचा सण आहे. त्यामुळे ठिकठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. अशातत ठिकठिकाणी भव्य दहीहंडी उत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे.  . गोविंदा पथक रचत असलेले थरावर थर नागरिकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू थर आहेत. अशातच कलाकारांनाही या दहीहंडी उत्सवाला आमंत्रित करण्यात येत आहे. बॉलिवूडमधील आणि मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते-अभिनेत्री आणि गायकांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं आहे. मागठाण्यातील तारामती चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीनेही दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला डान्सर गौतमी पाटील हिने हजेरी लावली आहे. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम…, या गाण्यावर तिने परफॉर्मन्स सादर केला.

गौतमी पाटीलचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचा डान्सही अनेकांना आवडतो. गौतमी पाटीलची एक झलक दिसावी म्हणून चाहते प्रयत्न करत असतात. अशात आज दहीहंडी उत्सवात गौतमी हजेरी लावणार म्हटल्यावर तिच्या चाहत्यांनी हजेरी लावली नसती तरच नवल! गौतमीचा डान्स पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम… या गाण्यावर गौतमीने परफॉर्मन्स सादर केला. तेव्हा प्रेक्षकांनीही तिच्यासोबत या गाण्यावर ठेवा धरला.

 Gautami Patil

पाव्हणं जेवला का? या गाण्यावरही गौतमीने जबरदस्त डान्स केला. तिच्या या डान्सला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. उपस्थितांनी टाळ्या अन् शिट्ट्यांच्या माध्यमातून डान्सला पसंती दिली. यावेळी तरूणाईत उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.

Gautami Patil

यावेळी गौतमीने माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा खूप छान वाटतंय. मी जास्त कार्यक्रम पुण्यात करते. आज मुंबईत कार्यक्रम करून छान वाटत आहे. कार्यक्रमानिमित्त मी बऱ्याच ठिकाणी जाते. सगळीकडे जसा प्रतिसाद असतो, तसाच इथेही चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांचं प्रेम बघून छान वाटलं. मुंबईत सुरक्षित वाटलं. इतर ठिकाणीही मी सुरक्षित आहे. पण मुंबईकरांचं आजचं प्रेम बघून मी भारावून गेली आहे, असं गौतमी पाटील म्हणाली.

मागाठाण्यातील तारामती चॅरिटेबल फाउंडेशन आणि आमदार प्रकाश सुर्वे तर्फे आयोजित भव्य दहीहंडी उत्सावाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात गौतमी पाटील हिच्यासोबतच करिश्मा कपूर, बिपाशा बसू यांची हजेरी पाहायला मिळत आहे. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील इथे येणार आहेत. त्यामुळे यंदाच्या या दहीहंडी उत्सवाचा तरूणाईमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?