Dahihandi News Live Gautami Patil | गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमात राडा, तरुणाला चोप

| Updated on: Sep 08, 2023 | 7:02 AM

Maharashtra Breaking news LIVE Updates | महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. याविषयीचा जीआर राज्य सरकारने काढला आहे.

Dahihandi News Live Gautami Patil | गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमात राडा, तरुणाला चोप

मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : राज्यभरात आज दहीहंडी उत्साहात आणि जल्लोषात साजरी होत आहे. राज्यात सर्वच ठिकाणी उंचच उंच दहीहंडी लावण्यात आल्या असून थरावर थर लावून दहीहंडी फोडण्यात येणार आहे. राज्यात सर्वच ठिकाणी हा थरार दिसणार आहे. मराठा आरक्षणावर आज जालन्याच्या अंतरावली सराटी येथे मराठा आंदोलकांची बैठक. मनोज जरांगे पाटील मोठा निर्णय घेण्याची शक्यता. भारताचं चांद्रयान-3 मिशन यशस्वी झाल्याने आता ऑस्ट्रेलियाही चंद्रावर यान पाठवणार. नंदूरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करा, काँग्रेसची मागणी. यासह राज्यासह देशातील विविध घडामोडी जाणून घ्या…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 07 Sep 2023 08:57 PM (IST)

  Gautami Patil | गौतमी पाटील हीच्या डान्सदरम्यान तरुणाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद

  मुंबई | मुंबईत दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. प्रसिद्ध नृत्यांगा गौतमी पाटील हीने मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडीला उपस्थिती लावून जबराट डान्स केला. गौतमी पाटील हीच्या डान्सदरम्यान राडा झाला. गौतमीच्या डान्सदरम्यान एका तरुणाला चांगलाच चोप देण्यात आला. मुलंडमधील कार्यक्रमात हा सर्व प्रकार घडला. मात्र त्या तरुणाला चोप देण्यामागचं कारण समजू शकलेलं नाही.

 • 07 Sep 2023 08:41 PM (IST)

  विधिमंडळात आमदारांसाठी एक आचारसंहिता असावी : उपसभापती निलम गोऱ्हे

  मुंबई | विधिमंडळात आमदारांसाठी आचारसंहिता असायला हवी, असं मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलंय.

  निलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

  लोकसभेने संपूर्ण भारतातल्या विधिमंडळासाठी एक यादी काढलीय. ती यादी दरवर्षी नवीन पद्धतीने तपासली जाते.या यादीत बोलीभाषेत असणारे शब्द असतात.पण काही वेळेला आमदारांच्या भावना तीव्र होतात. त्यावेळी दमदाटी,आणि दादागिरीची भाषा सुद्धा काही लोकांच्या तोंडून काढली जाते. यामध्ये नवीन आमदार असल्यामुळे अस होत असेल असं,मला वाटतं.ते विसरून जातात,आपण कुठे बोलतोय ते आपन सभागृहात काय बोलतोय चौकात हमरीतुमरी होत असल्यासारखे वागतात. त्यावेळी आम्हाला पीठासीन अधिकारी म्हणून सभापती म्हणून आमच्यावर काही बंधने आहे”, असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.

  “तसेच संसदीय कार्यक्रमाचा गरिमा एक प्रतिष्ठा राहिली पाहिजे.या दृष्टीने जे काय शिस्त पालन म्हणून त्यात मला सगळ्यांच सहकार्य मिळतं. माझ्या आखत्यारित अनेक गोष्टी आहेत. त्यानुसार चांगल्या प्रकारे कामकाज व्हावे या दृष्टीने वेळ पडल्यास आमदारांच्या दृष्टीने एक आचारसंहिता असावी”, असंही निलम गोऱ्हे म्हणाल्या.

 • 07 Sep 2023 08:21 PM (IST)

  Rohit Pawar | आमदार रोहित पवार यांचं गोविंदाना आवाहन, काय म्हणाले?

  मुंबई | मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. असंख्य पथकांकडून थर रचून हंडी फोडल्या जात आहेत. यामध्ये आतापर्यंत अनेक गोविंदा हे जखमी झाले आहेत. अशातच आमदार रोहित पवार यांनी गेल्या वर्षी 2022 मध्ये दहीहंडी दरम्यान गोविंदा प्रथमेश सावंत याचा मृत्यू झाल्याची आठवण करुन दिली. रोहित पवार यांनी या घटनेचा दाखला देत गोविंदांनी काळजी घेत सुरक्षेच्या सर्व उपाययोजनेसह सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे.

  रोहित पवार यांचं ट्विट

 • 07 Sep 2023 08:00 PM (IST)

  Jalna News : मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ मुंबईला सरकारच्या भेटीला जाणार

  मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ मुंबईला सरकारला भेटण्यासाठी जाणार आहे. सरकारची ऑफर मनोज पाटील यांनी स्वीकारली आहे. सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ही भेट असणार आहे. गावकऱ्यांचे विशेष शिष्ठमंडळ रवाना होईल. यामध्ये 16 ते 17 लोक असतील अभ्यासक, आंदोलक आणि शेतकरी

 • 07 Sep 2023 07:45 PM (IST)

  आमदार प्रकाश सुर्वे यांच्या भव्य दहीकाला महोत्सवाला देवेंद्र फडणवीस यांची हजेरी

  तारामती चॅरिटेबल फाउंडेशन आणि आमदार प्रकाश सुर्वे आयोजित मागाठाणे भव्य दहीकाला महोत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावलीये. तसेच गौतमी पाटील, अमिषा पटेल, श्रुती मराठे, प्राजक्ता गायकवाड, रुपाली भोसले, भूमी पेडणेकर, श्वेता परदेशी या कलाकारांनीही हजेरी लावली.

 • 07 Sep 2023 07:25 PM (IST)

  सगळे गोविंदा सुरक्षितपणे घरी पोहचले पाहिजेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राम कदम यांच्या दहीहंडीला पोहचले आहेत. एकनाथ शिंदे म्हणाले, हजारो गोविंदा रस्त्यावर आहेत. पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांवरील संकट दूर होवो. सगळे गोविंदा सुरक्षितपणे घरी पोहचले पाहिजेत. राम कदमांची दहीहंडी फेमम ते दहीहंडीमुळे आमदार झाले.

 • 07 Sep 2023 07:15 PM (IST)

  ठाण्यातील दहीहंडी उत्सवाला राज ठाकरे यांची हजेरी

  राज ठाकरे यांनी आज ठाण्यात अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. काही वर्षांपूर्वी दहीहंडी उत्साहावर हायकोर्टातून बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. पण आपण त्यासाठी लढलो होतो, अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितलं

 • 07 Sep 2023 07:11 PM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसला ट्रॅफिकचा फटका

  एकनाथ शिंदे हे राम कदम यांच्या हंडीसाठी रस्त्यावरून चालत आले आहेत. ट्रॅफिकमुळे गाडी पार्किंगला जागा नसल्याने मुख्यमंत्र्यांना चालत जाण्याची वेळ

 • 07 Sep 2023 06:55 PM (IST)

  पंतप्रधान मोदी जी-20 च्या तयारीचा आढावा घेणार

  इंडोनेशियाला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले आहेत. आज दिल्लीत G-20 शिखर परिषदेच्या तयारीचा आढावा घेतील. शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी इंडोनेशियाला गेले होते. पंतप्रधान मोदी सुषमा स्वराज भवन येथे कॅबिनेट मंत्र्यांची भेट घेतील, तिथे त्यांना G20 शिखर परिषदेच्या तयारीबद्दल माहिती दिली जाईल. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे जी20 बैठक होणार आहे.

 • 07 Sep 2023 06:50 PM (IST)

  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन उद्या दिल्लीत येणार

  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन जी 20 बैठकीसाठी उद्या दिल्लीत येणार आहेत. केंद्रीय मंत्री वीके सिंह त्यांचं स्वागत करण्यासाठी दिल्ली विमानतळावर जाणार आहेत.

 • 07 Sep 2023 06:35 PM (IST)

  सनातन धर्माबद्दल अशा पद्धतीने बोलू नये : आठवले

  ए राजा यांनी सनातनवरील केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले आपलं म्हणणं मांडलं आहे. सनातन धर्माच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीने बोलू नयेत. प्रत्येकाने आपल्या धर्माचे आणि जातीचं रक्षण करावं, असे देशाच्या संविधानात म्हटले आहे. द्रमुकचे खासदार ए राजा यांनी सनातनची तुलना एचआयव्हीशी केल्याने वाद निर्माण झाला आहे.

 • 07 Sep 2023 06:25 PM (IST)

  ए राजा यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही: काँग्रेस

  सनातन धर्म आणि ए राजा यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा स्पष्टीकरण दिलं आहे. “आम्ही अशा वक्तव्याशी सहमत नाही. या देशात प्रत्येकाची जागा, कमी-अधिक दाखवणे योग्य नाही. इंडिया आघाडीचे सर्व सदस्य सर्व धर्मांचा, सर्व जातींचा, सर्वांचा आदर करतात. ए राजा यांनी सनातनची तुलना एचआयव्हीशी केल्याने वादाला फोडणी मिळाली आहे.

 • 07 Sep 2023 06:09 PM (IST)

  घमंडिया आघाडीच्या नेत्यांना देव सद्बुद्धी देवो: अनुराग ठाकूर

  “आज मी देवाकडे प्रार्थना करतो की या घमंडिया युतीच्या नेत्यांचा अहंकार थोडा कमी व्हावा. त्यांची विचारसरणी थोडी सुधारून त्यांना बुद्धी द्या, हिंदू आणि सनातनचा अपमान करणारी खालच्या दर्जाची विधाने करत आहेत. त्यांचे नेते राहुल गांधींच्या द्वेषाच्या दुकानात द्वेषयुक्त वस्तू विकत आहेत.”, असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितलं.

 • 07 Sep 2023 05:35 PM (IST)

  Pune Dahi Handi 2023 | पुण्यातील धर्मवीर आनंद दीघे दहीहंडी उत्सवाला सुरुवात

  पुणे | पुण्यातील धर्मवीर आनंद दीघे दहीहंडी उत्सवाला सुरुवात झालीय. शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. ढोल-ताशा पथकाचं वादन सुरु झालं आहे. या दहीहंडीला 7 लाख 17 हजार रुपयांच बक्षीस ठेवण्यात आलंय. हांडेवाडीतील श्नीराम चौकात दहीहंडीचा उत्साह बघायला मिळतोय.

 • 07 Sep 2023 04:51 PM (IST)

  Dahihandi News : दहिहंडीला राजकीय नेते, कलाकारांची हजेरी

  दहिहंडीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. त्यातच वरुणराजाने कालपासून हजेरी लावल्याने गोविदांचा भर पावसात जल्लोष सुरु आहे. अनेक ठिकाणच्या दहिहंड्यांना राजकीय नेते, कलाकर हजेरी लावत आहे.

 • 07 Sep 2023 04:34 PM (IST)

  Dahihandi News : मुंबईत ठिकठिकाणी गोविंदाचा उत्साह शिगेला

  मुंबईसह राज्यात गोविंदाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. अनेक ठिकाणी थरावर थर रचत गोविंदांनी सलामी दिली आहे. अनेक ठिकाणच्या दही हंडीला गोविंदाचे पथक गर्दी करत आहे. दहीहंडीच्या उत्साहात, गोविंदाचा जल्लोष ओसंडून वाहत आहे.

 • 07 Sep 2023 04:21 PM (IST)

  CM Eknath Shinde News : मराठा आरक्षण देताना इतर समाजावर अन्याय करणार नाही-मुख्यमंत्री

  मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. त्यासाठी न्यायपालिकेला विनंती करण्यात येणार आहे. मराठा आरक्षण देत असताना इतर समाजावर अन्याय करणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

 • 07 Sep 2023 04:12 PM (IST)

  Maratha Reservation News : निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती

  निजाम कालीन मराठा-कुणबी नोंदी तापसण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. निवृत्त न्यायामूर्तींच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती एका महिन्यात अहवाल सादर करेल. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीचे अध्यक्ष असतील.

 • 07 Sep 2023 04:07 PM (IST)

  Maratha Reservation News : मराठवाड्यात कुणबी दाखले मिळणार

  मराठवाड्यातील नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबीचा दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नोंद असलेल्या मराठ्यांना कुणबीचे दाखले मिळतील. याविषयीच्या GR ची प्रत घेऊन अर्जुनराव खोतकर जरांगे पाटील यांच्या भेटीला. दोघांमध्ये चर्चा सुरु आहे. जीआर वाचून दाखविण्यात आला.

 • 07 Sep 2023 04:03 PM (IST)

  Maratha Reservation News : सरकारकडून कुणबी दाखल्याचा जीआर जारी

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केल्यानंतर राज्य सरकारकडून कुणबी दाखल्याचा जीआर जारी करण्यात आला. अर्जुनराव खोतकर हे जीआर घेऊन उपोषण स्थळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी त्यांना विनंती करण्यात येणार आहे.

 • 07 Sep 2023 03:26 PM (IST)

  Gautami Patil | मुंबईतील दहीहंडी कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर गौतमी पाटील म्हणाली….

  मुंबई | गौतमी पाटील हीने मुंबईतील मागेठाणे येथील दहीहंडी उत्सवात सहभाग नोंदवला. तिने प्रकाश सुर्वे यांच्या मागाठाणे येथील दहीहंडी कार्यक्रमात हजेरी लावून ठेका धरला. त्यानंतर तिने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रियादेखील दिली. “खूप छान वाटतंय. मी जास्त कार्यक्रम पुण्यात आणि राज्यातील इतर भागांमध्ये करते. आज मुंबईत कार्यक्रम करून छान वाटतंय. मी बरेच ठिकाणी जाते. जिथे जाते तिथे प्रतिसाद दिसतो. इथेही छान वाटलं. मुंबईत सुरक्षित वाटलं.  इतर ठिकाणीही मला सुरक्षित वाटतं”, असं गौतमी पाटील म्हणाली.

 • 07 Sep 2023 03:22 PM (IST)

  Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांचा पुरंदर दौरा रद्द

  मुंबई | पावसामुळे देवेंद्र फडणवीस यांचा पुरंदर दौरा रद्द झालाय. हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टर उडू शकत नाही. त्यामुळे त्यांचा दौरा रद्द झालाय. देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावणार आहेत.

 • 07 Sep 2023 03:21 PM (IST)

  Pune News | पुण्यात चंदननगरमध्ये आगीची घटना

  पुणे | चंदननगर, भाजी मार्केट, हंबीरराव मोझे शाळेमध्ये आज दुपारी ०२•४४ वाजता आगीची घटना घडली होती. अग्निशमन दलाकडून येरवडा फायरगाडी व मुख्यालयातून एक वॉटर टँकर घटनास्थळी दाखल असून सद्यस्थितीत आग आटोक्यात आली आहे. कुलिंग ऑपरेशन सुरू असून जखमी वा जिवितहानी नाही. शाळेच्या एका हॉलमधे ही आग लागली होती. आता कोणतीही धोका नाही.

 • 07 Sep 2023 02:21 PM (IST)

  Gautami Patil : दही हंडी उत्सवात गौतमी पाटीलचा डान्स

  मागाठाणे येथे तारामती चॅरिटेबल फाऊंडेशनचा दहीहंडी उत्सव सुरु आहे. या ठिकाणी प्रसिद्ध नृत्यांगन गौतमी पाटील आली आहे, तिचा नृत्याचा कार्यक्रम सुरु आहे. तिच्या वडिलांच नुकतच निधन झालं आहे.

 • 07 Sep 2023 01:51 PM (IST)

  LIVE UPDATE | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दहीहंडीनिमित्त जम्बो दौरा

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दहीहंडीनिमित्त जम्बो दौरा करणार आहेत. मुंबई, ठाण्यातील ३५ दहीहंडी उत्सवांना एकनाथ शिंदे भेट देणार आहेत.

 • 07 Sep 2023 01:45 PM (IST)

  LIVE UPDATE | मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला मुधोजीराजे भोसले

  मनोज जरांगे पाटील यांचा मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करिता आज उपोषणाचा 10 वा दिवस आहे. आज जरांगे यांना भेटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज मुधोजीराजे भोसले आले होते. यावेळी tv9 शी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र भेटले पाहिजे या मागणीचे समर्थन केले.

 • 07 Sep 2023 01:36 PM (IST)

  LIVE UPDATE | शरद पवारांनी 9 सप्टेंबरला मुंबईत बोलावली महत्वाची बैठक

  शरद पवारांनी 9 सप्टेंबरला मुंबईत महत्वाची बैठक बोलावली आहे. सगळे विद्यमान आमदार, खासदार बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील पक्षाचे माजी आमदार, माजी खासदार, जिल्ह्यांचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांना देखील बैठकीचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. जयंत पाटील आणि सुप्रिया सूळे बैठकीचं मार्गदर्शन करणार आहेत.

 • 07 Sep 2023 12:59 PM (IST)

  Dahihandi : उल्हासनगरमध्ये मनसेने फोडली भ्रष्टाचाराची दहीहंडी

  आज मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. उल्हासनगरमध्ये मनसेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. मनसेच्या पदाधीकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडण्यात आली.

 • 07 Sep 2023 12:45 PM (IST)

  Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे उद्या अहमदनगर दौऱ्यावर

  उद्धव ठाकरे उद्या अहमद नगर दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळी भागाची पाहाणी करणार आहेत. त्यानंतर ते स्थानिकांशी आणि पत्रकारांशी संवाद साधतील

 • 07 Sep 2023 12:34 PM (IST)

  Election 2024 : आगामी निवडणूकांसाठी काँग्रेस नागपूरातून प्रचाराची दही हंडी फोडणार

  आगामी निवडणूकांसाठी काँग्रेस पक्ष कंबंर खोचुन कामाला लागले आहे. निवडणूकीची रणनिती ठरवण्यासाठी अनेक उच्चस्थरीय बैठकाही होत आहेत. आगामी निवडणूकांसाठी काँग्रेस नागपूरातून प्रचाराची दही हंडी फोडणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची यामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे.

 • 07 Sep 2023 12:18 PM (IST)

  Maratha Reservation : सरकारच्या निर्णयाचं मराठा समाजाकडून स्वागत- मनोज जरांगे पाटील

  मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार उचलत असलेल्या पावलांचे मराठा समाज स्वागत करत असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. हे स्वागत सरसकट आरक्षणासाठी नसल्याचेही त्यांनी  यावेळी स्पष्ट केलं. आमच्याकडे वंशवळी नाही, आमचा मुळ व्यावसाय शेती आहे, त्यामुळे आम्हाला कुंभी समाजाचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

 • 07 Sep 2023 11:57 AM (IST)

  मागाठाण्यात भव्य दहीकाला महोत्सवाला सुरुवात

  तारामती चॅरिटेबल फाउंडेशन आणि आमदार प्रकाश सुर्वे तर्फे आयोजित मागाठाणे भव्य दहीकाला महोत्सवाची सुरुवात झाली आहे. तारामती चॅरिटेबल फाउंडेशन आणि आमदार प्रकाश सुर्वे आयोजित मागाठाणे भव्य दहीकाला महोत्सवमध्ये गौतमी पाटील, करिश्मा कपूर, बिपाशा बसू यांच्यासह अनेक मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते-अभिनेत्री येणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

 • 07 Sep 2023 11:45 AM (IST)

  जालन्यातील लाठीमारचे ठिकठिकाणी पडसाद

  जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. आंदोलनं केली जात आहेत.  मालेगावलातही या घटनेचे पडसाद उमटले.  मराठा क्रांती मोर्चाने रास्ता रोको करत निषेध नोंदवला.  मुंबई- आग्रा महामार्ग यावेळी अडवण्यात आला.

 • 07 Sep 2023 11:30 AM (IST)

  जालना लाठीमारच्या निषेधार्थ आज सांगली बंद

  जालना लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा बंद ठेवण्यात आला आहे. मराठा समाजाच्यावतीने ही हाक देण्यात आली आहे. सांगली शहरात बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.  मराठा समाजाच्या नेत्या महिला मानसी भोसले प्रणिता पवार, भक्ती चव्हाण यांनी हा बंद पुकारला आहे.  डॉ. संजय पाटील शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे हेदेखील बंदमध्ये सहभागी झालेत.

 • 07 Sep 2023 11:17 AM (IST)

  मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? वाचा…

  मुख्यमंत्री यांनी काल मराठा समाज संदर्भात निर्णय घेतले. माझ्याकडे काल अर्जुन खोतकर अंक राजेश टोपे आणि नंतर रावसाहेब दानवे आले होते.  ज्या मराठा समाजाकडे कुणबीची नोंद आहे. त्यांना आजपासून त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटणार आहे. पण आमचं म्हणणं आहे, एकच सुधारणा करा. आमच्याकडे वंशावळीचे प्रमाण पत्र नाहीत. त्यामुळे वंशावळी शब्द काढा अन् सरसकट प्रमाण पत्र मिळेल, असं म्हणा. मी उपोषण मागे घेतो, असं जरांगे पाटील म्हणाले.

 • 07 Sep 2023 10:30 AM (IST)

  कोल्हापूर : पंकजा मुंडे यांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन

  पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचा आज चौथा दिवस आहे. त्यांनी कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्यांच्यासह खासदार धैर्यशील माने देवीसमोर नतमस्तक झाले. यानंतर त्या खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.

 • 07 Sep 2023 10:18 AM (IST)

  सोलापूर : जालन्यातील लाठीचार्जच्या निषेधार्थ करमाळा शहरात भव्य मोर्चा

  जालन्यात झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ करमाळा शहर बंद ठेवत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

 • 07 Sep 2023 10:14 AM (IST)

  श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हैदराबादमधील इस्कॉन मंदिरात उसळली भाविकांची गर्दी

  श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हैदराबादमधील इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे.

 • 07 Sep 2023 10:01 AM (IST)

  Sanjay Raut : मनोज जरांगे गुंडाळले जाणार नाही – संजय राऊत

  गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांचे आंदोलन गुंडाळले होते. परंतु मनोज जरांगे यांना गुंडाळले जाऊ शकत नाही. जरांगे हे गुंडाळले जाणारे व्यक्ती नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 • 07 Sep 2023 09:56 AM (IST)

  Sanjay Raut : सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावा – संजय राऊत

  मराठा समाज आणि ओबीसी समाज सध्या अस्वस्थ आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. एका साध्या व्यक्तीने महाराष्ट्र सरकारला जेरीस आणले आहे. मराठा समाजाला सरकारने न्याय द्यावा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 • 07 Sep 2023 09:41 AM (IST)

  chandrashekhar bawankule : लक्ष्मणराव ढोबळे यांची नियुक्ती

  माजी मंत्री आणि भाजपचे नेते लक्ष्मणराव ढोबळे यांची भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रवक्तेपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. प्रवक्तेपदी नियुक्त झाल्यानंतर लक्ष्मण ढोबळे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

 • 07 Sep 2023 09:30 AM (IST)

  jalna lathi charge : आसूड ओढत आंदोलन

  मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने अंगावर आसूड ओढत आंदोलन करण्यात आले. तसेच जालन्यातील लाठीचार्ज घटनेचा निषेध करण्यात आला.

 • 07 Sep 2023 09:20 AM (IST)

  Farmer News : शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार

  नाशिक जिल्ह्यातील अनुदानासाठी पात्र असलेल्या तब्बल एक लाख 72 हजार 125 शेतकऱ्यांच्या खात्यावर कांद्याचे अनुदान जमा होणार आहे. यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात कांद्याचे भाव पडल्यानंतर कांद्याला अनुदान जाहीर करण्यात आला होता. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली असून टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत.

 • 07 Sep 2023 09:03 AM (IST)

  jalna lathi charge : आज सांगली बंद

  जालना येथे मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज सांगली उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आला. सांगली जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने आज सांगली बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार आज सांगली ग्रामीण जिल्हा आणि सांगली शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.

 • 07 Sep 2023 08:56 AM (IST)

  Pankaja Munde | पंकजा मुंडे परिक्रमा यात्रेचा आजचा चौथा दिवस

  पंकजा मुंडे यांच्या शिव शक्ती परिक्रमा यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे. पंकजा मुंडे आज कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेवून खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. पुढे सांगली येथे मंत्री सुरेश खाडे, कवठे महाकाळे येथे गणपतराव देशमुख यांच्या परिवारास भेट देणार. नंतर पंढरपुरात दर्शन घेवून सोलापूर येथून अक्कलकोटच्या दर्शनानंतर करमाळा येथे मुक्काम असेल.

 • 07 Sep 2023 08:40 AM (IST)

  Maratha reservation : मनोज जरांगे पाटील उपोषणाबाबत निर्णय घेणार

  आज सकाळी 11 वाजता सहकाऱ्यांसोबत चर्चा करुन मनोज जरांगे पाटील उपोषणाबाबत निर्णय घेणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. सरकारने दिलेल्या आश्वासनांमधला एक शब्दही इकडे तिकडे व्हायला नको, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

 • 07 Sep 2023 08:36 AM (IST)

  Rain update : एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाच कमबॅक

  मुंबईत दहीहंडीचा उत्साह आहे. त्याचवेळी मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. हिंगोली, इगतपुरी, भुसवाळ व मुक्ताईनगरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. ठाण, वसई आणि कल्याणमध्येही पाऊस सुरु आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 • 07 Sep 2023 08:20 AM (IST)

  ASEAN-India Summit : पंतप्रधान मोदी इंडोनेशियात

  18 व्या पूर्व आशिया आणि आसियान परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया जर्काता येथे गेले आहेत. या बैठकीत सहभागी होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे राहणाऱ्या भारतीय समुदायाची भेट घेतली.

 • 07 Sep 2023 08:00 AM (IST)

  rain : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगराला पावसाने झोडपले

  जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आणि मुक्ताईनगरसह इतर भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. रात्रीपासूनच या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या महिन्यापासून गायब झालेला पाऊस सुरू झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पावसाने दडी मारल्याने तापमानात प्रचंड वाढ झाली होती. शेतकऱ्यांची पिके करपू लागली होती. पिकांवर अनेक रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडले होते.

 • 07 Sep 2023 07:45 AM (IST)

  dahi handi : उल्हासनगरात मनसेने फोडली “भ्रष्ट्राचाराची दहीहंडी” !

  उल्हासनगर महापालिकेतील विविध विभागामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्ट्राचार होत आहे. यासाठी महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मनविसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी केला आहे. या भ्रष्ट कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज मनसेने उल्हासनगर महापालिकेच्या समोर भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडली. मनसेच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची संपूर्ण शहरात चर्चा रंगली आहे.

 • 07 Sep 2023 07:31 AM (IST)

  dahi handi : पुण्यात दहीहंडीचा जल्लोष, वाहतुकीच्या मार्गात बदल

  दहिहंडी पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पीएमपी मार्गात बदल करण्यात आला आहे. बसमार्ग क्र. ५० शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर स्वारगेट बस स्थानकावरून जाणार आहे. बस मार्ग क्र. ११३ अ. ब. चौक ते सांगवी या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर मनपा भवन स्थानकावरून जाणार आहे.

  बस मार्ग क्र. ८, ९, ५७, ९४, १०८, १४३, १४४, १४४ अ या मार्गाच्या बस रस्ता बंद झाल्यानंतर जाता-येता डेक्कन जिमखाना, मनपा भवन, गाडीतळ या मार्गाने जाणार आहे.

 • 07 Sep 2023 07:17 AM (IST)

  dahi handi : राज्यात दहीहंडीचा प्रचंड उत्साह, अनेक ठिकाणी फुटणार उंचच उंच दहीहंडी फुटणार

  राज्यात दहीहंडीचा उत्साह सुरू झाला आहे. आज अनेक ठिकाणी उंचच उंच आणि मानाच्या दहीहंडी फुटणार आहे. त्यासाठी गोविंदा पथके तयार झाली आहेत. यावेळी अनेक ठिकाणी राजकीय नेते आणि सेलिब्रिटीज उपस्थित राहणार आहेत.

Published On - Sep 07,2023 7:14 AM

Follow us
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका.
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान.
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?.
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'.
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप.
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची...
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची....
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्.
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?.