समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? एनसीबीविरोधात अजून एक पंच समोर, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा

| Updated on: Oct 27, 2021 | 2:03 PM

खारघरमधील 80/2021 या नायजेरियन ड्रग्स पेडलर प्रकरणात मला पंच करण्यात आलं होतं. त्यावेळी 10 कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या होत्या. ती कारवाई बोगस होती, असा आरोप पंच शेखर कांबळे याने केलाय.

समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? एनसीबीविरोधात अजून एक पंच समोर, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा
समीर वानखेडे, एनसीबी अधिकारी
Follow us on

मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, पंच प्रभाकर साईल याने केलेल्या लाचखोरीच्या आरोपानंतर आता खारघरमधील एका जुन्या प्रकरणातील अजून एक पंच समोर आलाय. शेखर कांबळे याने एनसीबीविरोधात गंभीर आरोप केले आहेत. खारघरमधील 80/2021 या नायजेरियन ड्रग्स पेडलर प्रकरणात मला पंच करण्यात आलं होतं. त्यावेळी 10 कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या होत्या. ती कारवाई बोगस होती, असा आरोप पंच शेखर कांबळे याने केलाय. (Reaction of witness Shekhar Kamble against Sameer Wankhede and NCB)

त्यावेळी मला पंचनामा वाचायला दिला नाही. जी कारवाई केली गेली ती बोगस होती. त्यात काही सापडलं नव्हतं. मात्र, 60 ग्राम एमडी सापडल्याचं दाखवण्यात आलं होतं. मी आणि माझा एक मित्र प्रचंड दहशतीत आहोत. काल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पेपरमध्ये या केसचा उल्लेख होता. ज्यात 60 ग्राम एमडी पकडल्याचं समजलं, त्यामुळे मी घाबरलो आहे, असं शेखर कांबळे टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाला.

सगळ्या चौकशीसाठी तयार- कांबळे

मला काल अनिल माने यांचा रात्री फोन आला. पण मी तिथे गेलो नाही, मला आता भीती वाटतेय. कोर्टात केस जाईल तेव्हा न्यायाधीश जे विचारतील तेव्हा मी काय उत्तर देणार? कारण मी पंचनामा वाचलेला नाही. म्हणून मी आता समोर आलोय. समीर वानखेडे मला 19 तारखेपर्यंत फोन करायचे, खूप वेळा फोन करायचे. मी नायजेरीयन नागरिकांची माहिती द्यायचो. पण त्यांनी मला अंधारात ठेवलं. मी पुढील सगळ्या चौकशीसाठी तयार आहे, असंही शेखर कांबळे याने सांगितलं.

समीर वानखेडेंचा निकाह लावणाऱ्या मौलानांचा खळबळजनक दावा

समीर वानखेडे आणि शबाना यांचा निकाह लावणाऱ्या मौलानांनी खळबळजनक दावा केलाय. मुलगा आणि मुलगी दोघेही मुस्लिम असल्याचं सांगितल्यानेच आम्ही निकाह लावला, असं मौलाना मुजम्मिल अहमद यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. इतकंच नाही तर निकाहावेळी समीर वानखेडे यांनी आपलं नाव समीर दाऊद वानखेडे असंच सांगिंतलं होतं, असंही मौलाना म्हणाले.

निकाहावेळी समीर यांनी दाऊद असंच नाव घेतलं होतं. आम्ही मुलाला त्याचं पूर्ण नाव सांगायला सांगतो, तसंच तुमचा निकाह शबाना यांच्यासोबत एवढ्या महरवर करत आहोत, तुम्हाला हे मान्य आहे? तेव्हा मुलगा म्हणते मान्य आहे. त्यानंतर स्वाक्षरी केली जाते. महरच्या समोरही स्वाक्षरी केली जाते. निकाह लावणारा काझीही त्यावर स्वाक्षरी करतो. तिथे उपस्थित असलेले साक्षीदारही आपली स्वाक्षरी करतात, असं मौलाना म्हणाले. त्याचबरोबर टीव्ही 9 च्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर समीर वानखेडे यांनी आपल्या वडिलांचं नाव दाऊद असंच सांगितल्याचंही ते म्हणाले. निकाहवेळी समीर वानखेडे यांनी आपल्या वडिलांचं नाव दाऊद असंच सांगितलं होतं. त्यावेळी ते दाऊदच बनले होते. त्यापूर्वी किंवा त्यानंतर त्यांचं नाव काय असेल ते आम्हाला काय माहिती, असंही मौलाना म्हणाले.

इतर बातम्या :

‘निकाहावेळी समीर दाऊद वानखेडे असंच नाव सांगितलं गेलं’, मौलाना मुजम्मिल अहमद यांचा खळबळजनक दावा

मौलानांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केलाय, क्रांती रेडकर म्हणाल्या, त्यांनी माहिती घ्यायला हवी होती !

Reaction of witness Shekhar Kamble against Sameer Wankhede and NCB