VIDEO | मौलानांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केलाय, क्रांती रेडकर म्हणाल्या, त्यांनी माहिती घ्यायला हवी होती !

समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू धर्म आणि जात महार असल्याचा उल्लेख आहे. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत त्यांचं लग्न झालं, त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आम्ही ते दाखवू शकतो" असं क्रांती रेडकर म्हणाल्या.

VIDEO | मौलानांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केलाय, क्रांती रेडकर म्हणाल्या, त्यांनी माहिती घ्यायला हवी होती !
मौलाना मुजम्मिल अहमद, समीर वानखेडे, क्रांती रेडकर
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 2:06 PM

मुंबई : NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला आहे, त्यानंतर समीर वानखेडेंच्या दुसऱ्या पत्नी आणि प्रख्यात मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी दावे फेटाळून लावत त्यांनी माहिती घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या क्रांती रेडकर?

“निकाहनाम्याचे पेपर सासूबाईंनी बनवले होते, ज्या मुस्लीम होत्या. मात्र माझा नवरा आणि सासऱ्यांशी त्याचा काहीही संबंध नाही. समीर वानखेडे कायदेशीरदृष्ट्या तेव्हाही हिंदू होते, आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर हिंदू धर्म आणि जात महार असल्याचा उल्लेख आहे. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत त्यांचं लग्न झालं, त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आम्ही ते दाखवू शकतो” असं क्रांती रेडकर म्हणाल्या.

“त्यांनी माहिती घ्यायला हवी होती”

“स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत दोन वेगवेगळ्या धर्माच्या व्यक्ती लग्न करतात. त्यांनी धर्म लपवल्याचा केलेला आरोप चुकीचा आहे. त्यावर नवरा-बायको दोघांच्या सह्या आहेत. मी हिंदू असल्याने इस्लाम धर्माची तेवढी मला माहिती नाही. पण मौलानांनी संविधानानुसार पाहिलं तर समीर तेव्हाही हिंदू होते. त्यांनी माहिती घ्यायला हवी होती” असं क्रांती म्हणाल्या.

“नवाब मलिकांनी जावयाला निर्दोष सिद्ध करावं”

नवाब मलिक काय वाटेल ते बोलत आहेत, त्यांचा जावई आठ महिने आत होता. त्यांनी त्याचं काय ते आधी बघावं, कागदपत्रं तपासावीत, त्याला निर्दोष सिद्ध करण्याचे प्रयत्न करावेत. माझे पती निष्पक्ष कारवाई करत आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एक डागही नाही. त्यामुळे त्याला अडकवण्याचा प्रयत्न करु नये. नवाब मलिक यांना मी विनंती करते तुम्ही खूप इज्जतदार माणूस आहात. तुम्ही एका चांगल्या मंत्र्यासारखे वागा. कोर्टात जाण्याचा निर्णय माझे सासरे आणि नणंद घेतील, अशी माहिती क्रांती रेडकर यांनी दिली.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

समीर वानखेडेंचा निकाह लावणाऱ्या मौलानांचा खळबळजनक दावा, दोघे मुस्लिम म्हणूनच निकाह लावला!

नवाब मलिकांनी जो निकाहनामा ट्विट केलाय तो खरा आहे, मौलानांनी खरं खरं सांगितलं, सहीसुद्धा दाखवली !

‘निकाहावेळी समीर दाऊद वानखेडे असंच नाव सांगितलं गेलं’, मौलाना मुजम्मिल अहमद यांचा खळबळजनक दावा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.