AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवाब मलिकांनी जो निकाहनामा ट्विट केलाय तो खरा आहे, मौलानांनी खरं खरं सांगितलं, सहीसुद्धा दाखवली !

नवाब मलिक यांनी आज समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विट केला होता. आता ज्यांनी समीर वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांचा निकाह लावला ते मौलाना मुज्जमिल अहमद समोर आले आहेत.

नवाब मलिकांनी जो निकाहनामा ट्विट केलाय तो खरा आहे, मौलानांनी खरं खरं सांगितलं, सहीसुद्धा दाखवली !
Maulana Muzammil Ahmed
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 1:14 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विट केला होता. आता ज्यांनी समीर वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांचा निकाह लावला ते मौलाना मुज्जमिल अहमद समोर आले आहेत. टीव्ही नेटवर्कच्या रिपोर्टरनं निकाहनामा दाखवला असता मौलाना मुज्जमिल अहमद यांनी तो निकाहनामा खरा असल्याचं सांगितलं आणि त्यांनी त्या निकाहनाम्यावरील सही माझीचं असल्याच सांगितलं आहे.

मौलाना मुज्जमिल अहमद नेमकं काय म्हणाले?

समीर आणि शबाना हे दोन्ही मुस्लीम असल्याचं सांगितलं गेलं त्यामुळं काझीनं निकाह लावला. जर दोन्हीपैकी एकजण मुस्लीम नसते तर त्यांचा निकाह झाला नसता. समीर वानखेडे आणि ज्ञानदेव वानखे़डे हे मुस्लीम होते त्यामुळे त्यांचा निकाह झाला. टीव्ही नेटवर्कच्या रिपोर्टरनं निकाहनामा दाखवला असता मौलाना मुज्जमिल अहमद यांनी तो निकाहनामा खरा असल्याचं सांगितलं आणि त्यांनी त्या निकाहनाम्यावरील सही माझीचं असल्याच सांगितलं आहे. समीरच्या लग्नावेळी सर्वजण मुस्लीम असल्याचं सांगण्यात आलं होतं. समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नावेळचा फोटो दाखवला असता तो देखील खरा असल्याचं मौलाना म्हणाले.

निकाह का झाला?

मुलगा आणि मुलगी मुस्लीम असल्याशिवाय काझी निकाह लावत नाही. शरियतनुसार मुलगा किंवा मुलगी मुस्लीम नसल्यास काझी निकाह लावत नाही, असं मौलना मुज्जमिल अहमद यांनी म्हटलंय. दोघेही मुस्लीम होते त्यामुळे निकाह लावण्यात आला, असं मौलाना म्हणाले. शरियतच्या कायद्यानुसार साक्षीदार देखील मुस्लीम हवेत, असं ते म्हणाले. समीर आणि शबाना यांच्यात तलाक झाल्याचं तुमच्याकडूनचं कळाल असल्याच ते म्हणाले. समीरचे वडिल दाऊद मुस्लीम असल्यानंचं निकाह लावण्यात आला, असं मौलाना मुज्जमिल अहमद म्हणाले.

समीर वानखेडेंच्या वडिलाचं नाव दाऊद कसं?

निकाहनाम्यावर समीर वानखेडेंनी दाऊन नाव लिहिलं. त्यानंतर काही झाल्यास आम्हाला काही माहिती पण त्यावेळी निकाहनामन्यावर दाऊद लिहिण्यात आलं, असं मौलाना मुज्जमिल अहमद म्हणाले.

इतर बातम्या:

जावयाला अटक केल्यानं आकसापोटी आरोप, नवाब मलिकांच्या विरोधात कोर्टात जाणार, समीर वानखेडेंच्या वडिलांची माहिती

‘मिस्टर फडणवीसांकडून खंडणीखोर सैतानाची तरफदारी’, दादरा नगर-हवेलीत संजय राऊतांचा पलटवार

Maulana Muzammil Ahmed said Nikahnama tweeted by Nawab Malik is true

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.