जावयाला अटक केल्यानं आकसापोटी आरोप, नवाब मलिकांच्या विरोधात कोर्टात जाणार, समीर वानखेडेंच्या वडिलांची माहिती

ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. गेल्या दहा पंधरा दिवसांपासून माझ्या मुलाला बदनाम करण्याची मालिका सुरु झालेली आहे, असं ज्ञानदेव वानखेडे म्हणाले.

जावयाला अटक केल्यानं आकसापोटी आरोप, नवाब मलिकांच्या विरोधात कोर्टात जाणार, समीर वानखेडेंच्या वडिलांची माहिती
ज्ञानदेव वानखेडे
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 12:41 PM

मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीन वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी माझ्या मुलाचं जात प्रमाणपत्र मुस्लीम जातीचं नसल्याचं म्हटलं आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विविध कागदपत्रे दाखवली. ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. गेल्या दहा पंधरा दिवसांपासून माझ्या मुलाला बदनाम करण्याची मालिका सुरु झालेली आहे. नवाब मलिकांना नक्की काय म्हणायचं आहे. त्यांच्या मनात काय हे समजत नाही. जातीचं प्रमाणपत्र, लग्नाचं प्रमाणपत्र सादर केलेलं आहे. नवाब मलिक मंत्री असून आकसापोटी किंवा जावयांना अटक केल्यामुळं असं करतायत का?, असं ज्ञानदेव वानखेडे म्हणाले. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंचं दाखवलेलं जन्म प्रमाणपत्र खोटं आहे. नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे यांना विचारून मी कोर्टात जाणार असल्याचं ज्ञानदेव वानखेडे म्हणाले आहेत.

आम्ही धर्मनिरपेक्ष लोक

नवाब मलिक आमच्या कुटुंबाच्या मागं लागलेले आहेत. आम्ही धर्मनिरपेक्ष लोक आहोत. समीरनं आईच्या सांगण्यावरून मुस्लीम मुलीशी लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांनी विशेष विवाह कायद्यानुसार लग्न केलं होतं. नवाब मलिक यांना काय हवंय हे समजत नाही, असं ज्ञानदेव वानखेडे म्हणाले. हिंदू आणि मुस्लीम असल्याल निकाह बेकायदेशीर ठरवला जातो. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आईच्या नावानं विवाहाची नोंदणी केलेली आहे.

आर्यन खानच्या वकिलांनी असं देण घेण झालेलं नाही, असं सांगितलेलं आहे तर प्रभाकर साईल कशाच्या आधारावर आरोप करत आहे. माझा मुलगा 15 वर्षापासून नोकरीत आहे त्याला डाग लागलेला नाही, असं ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटलंय.

प्रभाकर साईलचे आरोप म्हणजे पंच फोडण्याचा प्रकार

मी स्वत: मागासवर्गीय आहे, झोपडीत राहून अभ्यास केलेला आहे. मी मागासवर्गीय असून माझी जात असेल तिच माझ्या मुलाची जात असेल. जातीचा दाखला आहे तो दाखवला आहे. समीर वानखेडेंनी दिलेली कागदपत्रं खरी असल्याचं ज्ञानदेव वानखेडे म्हणाले. नवाब मलिक काही करु शकतात. माझ्या मुलाची पंधरा वर्षाची सेवा झाली त्यात त्याच्यावर कोणताही आरोप करण्यात आलेला नाही. नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केल्यानंतर ते आकसापोटी हे करत आहेत. प्रभाकर साईलनं केलेले आरोप हे पंच फोडण्याचा प्रकार आहे, असं ज्ञानदेव वानखेडे म्हणाले.

इतर बातम्या:

खंडणीखोरांसाठी विरोधी पक्षनेत्यांची वकिली, फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही: संजय राऊत

Kangana Ranaut : कंगना रनौत पोहोचली सेल्युलर जेलमध्ये, याच ठिकाणी वीर सावरकरांना झाली होती काळ्या पाण्याची शिक्षा, पाहा फोटो

Dnyandev Wankehde said he will approach Court Against Nawab Malik

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.