खंडणीखोरांसाठी विरोधी पक्षनेत्यांची वकिली, फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही: संजय राऊत

खंडणीखोरांसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते वकिली करतात हे दुर्दैव आहे. फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचे होत असलेलं अधःपतन मला बघवत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

खंडणीखोरांसाठी विरोधी पक्षनेत्यांची वकिली, फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही: संजय राऊत
संजय राऊत, देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 12:02 PM

सिल्वासा: शिवसेना खासदार संजय राऊत सध्या दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. शिवसेनेनं दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीसाठी कलाबेन डेलकर यांनी उमदेवारी दिलीय. दादरा नगर हवेलीच्या मुद्यासोबत एनसीबीवरुन संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. NCB अनेक प्रकरणे केली. रिया चक्रवर्ती प्रकरणात काय झाले ? एका प्रकारे खंडणीखोरी आहे. अशा खंडणीखोरांसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते वकिली करतात हे दुर्दैव आहे. फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचे होत असलेलं अधःपतन मला बघवत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

फडणवीसांचं अध:पतन बघवत नाही

देवेंद्र फडणवीस यांना बोलायचे ते बोलू द्या, भाषणात ते टाळीची वाक्ये घेतात. पण, काल इथे त्यांना टाळ्याही पडल्या नाहीत, असे मला कळाले. फडणवीस यांना वाटत असेल की ते इथे आल्याने मराठी मतदान भाजपच्या पारड्यात पडेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. इथली मराठी जनता पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी आहे. तपास यंत्रणांचा वापर हा केंद्राचा महाराष्ट्र सरकार विरोधातील कट आहे. स्वतः मुख्यमंत्रीही तेच सांगत आहेत. महाराष्ट्रात सरकार आले नाही याचा राग काढला जात आहे. महाराष्ट्राचा कणा ताठ आहे, कुणापुढे झुकणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले. गेल्या काही काळात एनसीबीनं अनेक प्रकरणे केली. रिया चक्रवर्ती प्रकरणात काय झाले ? एका प्रकारे खंडणीखोरी आहे. अशा खंडणीखोरांसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते वकिली करतात हे दुर्दैव आहे. फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचे होत असलेलं अधःपतन मला बघवत नाही, असं राऊत म्हणाले.

इथल्या प्रशासकाची खंडणीखोरी दिसत नाही?

एका ज्येष्ठ खासदार आपलं जीवन संपवतो आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला वाटलं नाही की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी ? महाराष्ट्र सरकार ती चौकशी करतेय पण केंद्र सरकारची पण जबाबदारी होती. भाजपचे अनेक लोक या प्रकरणाशी संबंधीत कारण डेलकर यांच्या चिट्ठीत अनेकांची नावे. इथल्या प्रशासकाचे नाव त्या चिठ्टीत होतं. अशा प्रकारच्या निवडणुका भाजपने लढवल्या नाहीत का ? आम्हाला खडणीखोर म्हणत असाल तर इथे भाजप प्रशासकाच्या खंडणीखोरीवर फडणवीस बोलत नाहीत ? इथली जनता त्रस्त आहे…म्हणून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. मिस्टर फडणवीस खंडणीखोर सैतानाची तरफदारी करीत आहेत,असं संजय राऊत म्हणाले. आम्हाला ख्रात्री पूर्ण खात्री ही जागा जिंकतोय आणि विजयी सभेला उद्धव ठाकरे येतील,असंही संजय राऊत म्हणाले.

आम्ही तोंड उघडलं तर…

देवेंद्र फडणवीस काय बोलतात यावर परसेप्शन ठरत नाही. आमच्या दलालीवर बोलता, आम्ही तोंड उघडले आणि दिल्लीतील आणि महाराष्ट्रातली पाच वर्षांची, गुजरातची 20 वर्षे तर दलाली काय याचा खरा अर्थ देशाला कळेल. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये, असा इशारा देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला दिला.

समीर वानखेडे प्रकरणी बोलताना संजय राऊत यांनी ज्याने पाप केले तर त्याला भरपाई करावी लागेल. काही कधीच लपून राहतील. नवाब मलिक हे ज्या गोष्टी समोर आणत आहेत त्या दुर्लक्षित करून चालणार नाही.एनसीबी आणि वानखेडे प्रकणात कठोर भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्राचे ताठ कण्याचे आहे, केंद्र सरकार पुढे झुकणार नाही हे दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे. समीर वानखेडे यांनी जे काही केलं त्याची चौकशी व्हायलाच हवी असं संजय राऊत म्हणाले

इतर बातम्या:

Sanjay Raut | दादरा नगर हवेली अजूनही पारतंत्र्यात आहे – संजय राऊत

नरेंद्र मोदींनी दादरा नगर हवेलीला यावं, प्रशासन इथल्या लोकांना गुलामासारखं वागवतंय ते पाहावं: संजय राऊत

Sanjay Raut slam Devendra Fadnavis regarding NCB and DNH By election

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.