एखाद्याला लाडाने मुन्ना, चुन्ना हाक मारतात तसं कोणीतरी मला ‘दाऊद’ म्हणत असेल, समीर वानखेडेंच्या वडिलांचा अजब दावा

कोणीही मला काहीही हाक मारत असो, पण मी मागासवर्गीय आहे. मग माझा मुलगा समीर मुस्लीम कसा होऊ शकतो? फेसबुकवर दाऊद वानखेडे या नावाने प्रोफाईल असल्याचे मला माहिती नाही. पण एखादवेळी माझ्या पत्नीकडील नातेवाईक मला दाऊद म्हणाले असतील | Dnyandev Wankhede

एखाद्याला लाडाने मुन्ना, चुन्ना हाक मारतात तसं कोणीतरी मला 'दाऊद' म्हणत असेल, समीर वानखेडेंच्या वडिलांचा अजब दावा
ज्ञानदेव वानखेडे
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 12:37 PM

मुंबई: समीर वानखेडे यांनी आपली धार्मिक ओळख लपवल्याच्या आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक यांनी केला आहे. या आरोपाला बुधवारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याची कागदपत्रे जाहीर केली होती. मात्र, एखाद्याला लाडाने मुन्ना, चुन्ना अशी हाक मारली जाते. तसंच माझ्या पत्नीचे नातेवाईक किंवा अन्य कोणीतरी मला प्रेमाने दाऊद हाक मारत असावेत. मी ही शक्यता नाकारत नाही, असा अजब दावा ज्ञानदेव वानखेडे यांनी केला.

कोणीही मला काहीही हाक मारत असो, पण मी मागासवर्गीय आहे. मग माझा मुलगा समीर मुस्लीम कसा होऊ शकतो? फेसबुकवर दाऊद वानखेडे या नावाने प्रोफाईल असल्याचे मला माहिती नाही. पण एखादवेळी माझ्या पत्नीकडील नातेवाईक मला दाऊद म्हणाले असतील, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटले. तसेच आपण लवकरच समीर वानखेडे यांच्या खरा जन्मदाखला सादर करु, असा दावाही ज्ञानदेव वानखेडे यांनी केला.

‘निकाहनाम्यावर समीरचं नाव मुस्लिम का?’

नवाब मलिक यांनी बुधवारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत त्यांचा निकाह झाला होता. या निकाहनाम्यावर समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे. याविषयी ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समीरच्या आईने लग्नासाठी आग्रह धरला होता. मुस्लिम मुलीशी निकाह करायचा असेल तर दोघांचाही धर्म एकच असायला हवा. अन्यथा तो विवाह ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे समीरच्या आईने निकाहनाम्यावर त्याला सही करायला लावली. यामध्ये काहीही गैर नाही, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले.

वानखेडे यांचा जन्मदाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे बडे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेले अनेक दिवस दररोज पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मलिक वानखेडेंविरोधात अनेक दावे ते करत आहेत. मलिकांच्या आरोपांना काल समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही हिंदूच आहोत हे देखील तिने ठासून सांगितलं. पण मलिक त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा निघाल्यास मंत्रिपद सोडेन, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.

हे ही वाचा :

महाराष्ट्र सरकार समीर वानखेडेंच्या पाठीमागे लागलंय का? पत्नी क्रांती रेडकरचं बेधडक उत्तर

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.