AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत GBS चा पहिला बळी, नायर रुग्णालयात एकाचा मृत्यू

मुंबईत गुलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) चा प्रादुर्भाव वाढत असून, एका 53 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. वडाळ्यातील या रुग्णाचा नायर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंधेरी आणि पालघरमध्येही GBS चे नवीन रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत GBS चा पहिला बळी, नायर रुग्णालयात एकाचा मृत्यू
गुलियन बॅरे सिंड्रोमImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Feb 12, 2025 | 1:18 PM
Share

सध्या महाराष्ट्रातगुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईतही या आजाराचे थैमान पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत जीबीएस या आजाराने शिरकाव केला होता. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यातच आता मुंबईतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुंबईत जीबीएस आजारामुळे पहिला बळी गेला आहे. वडाळ्यात राहणाऱ्या एका 53 वर्षीय रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

नायर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वडाळ्यात राहणारा एक रहिवाशी हा बीएन देसाई रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करत होता. तो गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली.

यामुळे पुण्यानंतर मुंबईतही जीबीएसचे थैमान पाहायला मिळत आहे. नायर रुग्णालयात या व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. वडाळ्यातील 53 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूमुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

अंधेरीत एकाला लागण

काही दिवसांपूर्वी मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजे GBS ची लागण झाली होती. ही व्यक्ती अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात राहते. या व्यक्तीवर महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्यामुळं अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली होते.

मुरजी पटेल यांनी सेव्हन हिल्स रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली होती. तसेच रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी 50 विशेष बेड राखीव ठेवावे, अशी सूचना केली होते. तसेच या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जावेत, अशी सूचनाही देण्यात आली होती.

पालघरमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीला जीबीएसची लागण

दरम्यान, पालघरमध्ये दहावीच्या एका विद्यार्थिनीला जीबीएसची लागण झाली आहे. या मुलीवर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे, असी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....