AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput suicide case | रिया चक्रवर्तीची प्रियांकासिंह विरोधात तक्रार, न्यायायलयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची बहीण प्रियांकासिंह, मीतूसिंह, आणि एम्सचे डॉक्टर तुरुण कुमार यांचविरोधातील तक्रारीवर न्यायालय आज निकाल देणार आहे. (reha chakraborty Priyanka singh Rajput)

Sushant Singh Rajput suicide case | रिया चक्रवर्तीची प्रियांकासिंह विरोधात तक्रार, न्यायायलयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष
रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंह राजपूत
| Updated on: Feb 15, 2021 | 7:15 PM
Share

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची बहीण प्रियांकासिंह (Priyanka singh), मीतूसिंह (mitu singh), आणि एम्सचे डॉक्टर तुरुण कुमार (dr Tarun Kumar) यांचविरोधातील तक्रारीवर न्यायालय आज निकाल देणार आहे. सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Reha Chakraborty)हिने वांद्रे पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली होती. (mumbai high court will give result on reha chakraborty complaint against Priyanka singh Rajput)

अभिनेता सुशांतसिंह राजपूत च्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचे नाव समोर आल्यानंतर रियावर टीकेची झोड उडाली होती. यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप केले होते. अभिनेत्रत्री रियानेसुद्धा वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये तिने सुशांतची बहीण प्रियांकासिंहवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हा गुन्हा रुद्द करण्यासाठी प्रियांकासिंह, मितूसिहं आणि ड़ॉ. तरुण कुमार यांनी न्यायालयात धाव घेतली होती. आरोपींच्या याच मागणीवर कोर्टात आज सुनावणी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निखिल कापसे यांनी मुंबई उच्च न्यायायलयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. या प्रतिज्ञापत्रात रिया चक्रवर्तीने केलेल्या तक्रारीतील आरोपी प्रियांकासिंह, मितूसिहं, एम्सचे डॉ. तरुण कुमार यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करू नये असं म्हटलेलं आहे.

रिया चक्रवर्तीचे आरोप काय ?

सुशांतसिंहने आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. समाजमध्यमं आणि सुशांतच्या चाहत्यांकडून रियावर टीका केली जात होती. यावेळी सुशांतची बहीण प्रियांकाने रियावर अनेक आरोप केले होते. रियानेसुद्धा प्रियांकासिंहवर अनेक आरोप केले होते. सुशांतवर उपचार करण्यासाठी प्रियांकाने डॉक्टर तरुण कुमार यांच्याशी संगनमत करुन खोटे मेडिकल प्रिस्क्रिप्शन तयार केले होते, असा आरोप रियाने केला होता. तसेच, रियाने आपल्या तक्रारीत प्रियांकाने तिला 2019 मध्ये लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती. तसेच माझा विनयभंग करण्याचाही प्रयत्ने केला होता, असे म्हटले होते.

दरम्यान, या प्रकरणात आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

Rhea Chakraborty bail | तब्बल 28 दिवसानंतर रियाची सुटका, भायखळा तुरुंगाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त!

सिद्धार्थ पिठानीसोबत बहिणीच्या वर्तनावर सुशांत नाखुश, रिया चक्रवर्तीकडून व्हाॅट्सअ‍ॅप चॅटचा दाखला

(mumbai high court will give result on reha chakraborty complaint against Priyanka singh Rajput)

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....