दोघांचं प्रेम होतं, त्यानं तिला पेटवलं, तिनं नंतर त्यालाच मिठी मारली.. पुढं जे घडलं त्यानं मुंबई हादरली !

प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोप टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत प्रियकराच मृत्यू झाला (Mumbai Jogeshwari youth burn girlfriend)

दोघांचं प्रेम होतं, त्यानं तिला पेटवलं, तिनं नंतर त्यालाच मिठी मारली.. पुढं जे घडलं त्यानं मुंबई हादरली !

मुंबई : जोगेश्वरी विभागातील मेघवाडी परिसरात धक्कादायक अशी घटना घडली आहे. प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोप टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत प्रियकराच मृत्यू झाला असून प्रेयसी मात्र, मृत्यूशी झुंज देत आहे. शनिवारी ( 6 फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली असून याबाबत परिसरात संताप व्यक्त केला जात आहे (Mumbai Jogeshwari youth burn girlfriend).

मालती (नाव बदलेल आहे) आपल्या कुटुंबासोबत मेघवाडी येथे राहते. जवळच राहणाऱ्या विजय खांबे याच्या सोबत तिचं प्रेम प्रकरण होतं. खरं तर विजय तिचा नातेवाईही आहे. विजय हा मालतीच्या बहिणीचा दिर आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबात जवळचे नाते संबंध आहेत. यातूनच दोघात प्रेम प्रकरण सुरू झालं (Mumbai Jogeshwari youth burn girlfriend).

मालती 28 वर्षाची तर विजय 30 वर्षाचा आहे. दोघात गेल्या अडीच-तीन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. विजयच्या घरच्यांनी मालतीला विजयसाठी मागणीही घातली होती. विजयला दारूचं व्यसन आहे. दरम्यान, मालतीच्या घरच्यांनी काही कारणास्तव विजयचं स्थळ नाकारलं होतं. त्यानंतर विजय दारूच्या नशेत मालतीला सारखा त्रास देत होता. मानसिक छळ करत होता. या त्रासाला कंटाळून मालती हिने काही दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यातून वाचली. आठ-दहा दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर काही दिवसांपूर्वी ती घरी आली होती.

शनिवारी (6 फेब्रुवारी) मालती ही घरी एकटीच आहे, याची माहिती मिळाल्यावर विजय हा तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तिच्या घरी गेला. यावेळी त्याने बाटलीतून पेट्रोल नेलं होतं. त्याच्याकडे लायटरही होतं. विजय मालतीच्या घरी पोहचल्यावर त्यांच्यात पुन्हा भांडण सुरू झालं. यावेळी रागाच्या भरात विजयने स्वतःच्या हातातील पेट्रोलची बाटली मालतीच्या अंगावर ओतली आणि तिला पेटवून दिलं.

यावेळी विजय तिथेच दरवाजात उभं राहून मालती जळत असल्याचं बघत होता. यावेळी मालतीने पेटत्या अंगानेच विजयला मिठी मारली. यावेळी विजयही आगीने होरपळला. त्या अवस्थेत दोघे घराच्या बाहेर पडले. शेजाऱ्यांनी पाणी टाकून आग विझवली. त्यानंतर दोघांना जोगेश्वरी येथील हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी दोघांना जे जे हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. विजय मोठ्या प्रमाणात भाजला असल्याने त्याचा मृत्यू झाला. तर मालती हिच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत तरुणीच्यावतीने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलीस तपास करत आहेत.

संबंधित बातमी : प्रियकराने पेट्रोल ओतून पेटवलं, प्रेयसीने मिठी मारली, मुंबईत तरुणाचा होरपळून मृत्यू

Published On - 5:18 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI