लसीचं सर्टिफिकेट दाखवा, पास घ्या; आजपासून खाजगी नोकरदार वर्गाचा रेल्वे प्रवासाचा श्रीगणेशा!

| Updated on: Aug 16, 2021 | 9:21 AM

सर्वसामान्य प्रवासी आणि खासगी नोकरदार वर्गासाठी 15ऑगस्टपासून लोकलसेवा सुरू करण्यात आली असली, तरीही काल रविवार असल्यानं आज आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थाने खासगी नोकरदार वर्गाने लोकल प्रवासाचा श्रीगणेशा केला.

लसीचं सर्टिफिकेट दाखवा, पास घ्या; आजपासून खाजगी नोकरदार वर्गाचा रेल्वे प्रवासाचा श्रीगणेशा!
मुंबई लोकल
Follow us on

मुंबई : सर्वसामान्य प्रवासी आणि खासगी नोकरदार वर्गासाठी 15ऑगस्टपासून लोकलसेवा सुरू करण्यात आली असली, तरीही काल रविवार असल्यानं आज आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थाने खासगी नोकरदार वर्गाने लोकल प्रवासाचा श्रीगणेशा केला. ज्या प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले असतील, अशाच प्रवाशांना कालपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलीये.

मागील वर्षभरापासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन, म्हणजेच मुंबईच्या लोकलची दारं अखेर 15 ऑगस्टपासून खासगी नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. मात्र यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणं बंधनकारक करण्यात आलंय.

लसीचं सर्टिफिकेट दाखवा, पास घ्या

कोरोना लसीचं अंतिम सर्टिफिकेट दाखवून प्रवाशांना पास दिला जात असून यानंतर प्रवाशांनी आजपासून लोकल प्रवासाचा श्रीगणेशा केला आहे. 15 ऑगस्टपासून राज्य सरकारने या प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा दिली होती. मात्र काल रविवार असल्यामुळे आज आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून खाजगी नोकरदार वर्गाने रेल्वे प्रवास सुरु केला. आज बँक हॉलिडे असल्यामुळे सरकारी आणि बँक कर्मचाऱ्यांची गर्दी कमी होती. मात्र खाजगी नोकरदार वर्गाने सकाळपासूनच रेल्वे प्रवासाला सुरुवात केली.

आजपासून मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे खुले

गेले कित्येक महिने निर्बंधात राहून कंटाळलेल्या मुंबईकरांना आजपासून मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आजपासून मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे खुली झाली आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत या सर्व गोष्टी खुल्या ठेवण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. परंतु हा निर्णय घेताना महापालिकेने नियम आणि अटींचं बंधन घातलं आहे, जे नागरिकांना पाळावं लागणार आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर उपाययोजना अनिवार्य राहतील.

कोव्हिडची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. च्याच अनुषंगाने ब्रेक द चेन अंतर्गत आपण मुंबईत शिथिलता देत असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे सुरु राहतील पण यांसाठी वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत, जे नियम पाळणं नागरिकांना अनिवार्य असेल.

(mumbai Local train journey of the private working class starts from today)

हे ही वाचा :

Mumbai Unlock Guidelines : मैदाने, उद्याने, चौपाट्या, हॉटेल आणि मॉल, आता सर्व सुरु, पण नियम काय?