AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Unlock Guidelines : मैदाने, उद्याने, चौपाट्या, हॉटेल आणि मॉल, आता सर्व सुरु, पण नियम काय?

गेले कित्येक महिने निर्बंधात राहून कंटाळलेल्या मुंबईकरांना आजपासून मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आजपासून मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे खुली झाली आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत या सर्व गोष्टी खुल्या ठेवण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

Mumbai Unlock Guidelines : मैदाने, उद्याने, चौपाट्या, हॉटेल आणि मॉल, आता सर्व सुरु, पण नियम काय?
Mumbai Unlock
| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 8:57 AM
Share

मुंबई : गेले कित्येक महिने निर्बंधात राहून कंटाळलेल्या मुंबईकरांना आजपासून मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आजपासून मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे खुली झाली आहेत. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत या सर्व गोष्टी खुल्या ठेवण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. परंतु हा निर्णय घेताना महापालिकेने नियम आणि अटींचं बंधन घातलं आहे, जे नागरिकांना पाळावं लागणार आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर उपाययोजना अनिवार्य राहतील.

कोव्हिडची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. च्याच अनुषंगाने ब्रेक द चेन अंतर्गत आपण मुंबईत शिथिलता देत असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे सुरु राहतील पण यांसाठी वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत, जे नियम पाळणं नागरिकांना अनिवार्य असेल.

सगळं सुरु तर झालं पण नियम कोणते?

1) लोकल- आरोग्य सेवाव देणारे अधिकारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच कोव्हिड लसीच्या दोन मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल.

2) हॉटेल- हॉटेल 50 टक्के क्षमतेसह रात्री 10 पर्यंत खुली राहणार आहेत. हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण आवश्यक आहे. एसी हॉटेलमधील खिडक्या उघड्या ठेवणे बंधनकारक आहे.

3) दुकाने- सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत खुली ठेवता येणार आहेत. दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण घेऊन 14 दिवस होणे आवश्यक आहे.

4) शॉपिंग मॉल- सर्व शॉपिंग मॉल रात्री 10 पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. मॉलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण घेऊन 14 दिवस होणे आवश्यक आहे.

5) जिम्नॅशिअम, योगासेंटर, सलून-स्पा- वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगासेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेनेसर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा

5) इनडोअर स्पोर्ट्स- लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण होणे आवश्यक, या ठिकाणी खेळताना बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्क्वॅश, मलखांब अशा खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा

6) विवाह सोहळे- खुल्या प्रांगणातील/बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असाव्यात

(mumbai unlock relaxation in Corona restriction Since Today Mumbai Municipal Carporation)

हे ही वाचा :

Maharashtra Unlock | रेस्टॉरंट, दुकानं ते लोकल, राज्यात कोणकोणत्या कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.