Mumbai Mayor: देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा;उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्यानं फिरलं गणित, राजकारणात मोठा ट्विस्ट?

BMC Mayor: काल उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा होईल असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिकेचा महापौर कोण यावरून मोठा ट्विस्ट आला आहे. शिंदे सेनेने मोठा खेला केला आहे.

Mumbai Mayor: देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचा;उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्यानं फिरलं गणित, राजकारणात मोठा ट्विस्ट?
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस मुंबई महापौर
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 18, 2026 | 10:30 AM

Uddhav Thackeray-Eknath Shinde-Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर महापौर शिवसेनेचा होईल असं काल सूचक वक्तव्य केलं आणि मुंबईत मोठा ट्विस्ट आला. रात्रीतूनच गणित फिरलं. एकीकडे महापौर हा महायुतीचाच होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. पण सर्वाधिक जागा भाजपनं मिळवल्या आहेत. त्यामुळे महापौर कुणाचा होईल हे चित्र स्पष्ट आहे. हे बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे महापौर शिवसेनेचा हवा अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यानंतर लागलीच मुंबईतील समीकरणं फिरली.शिंदे सेनेचे २९ नगरसेवकांचा तीन दिवसांसाठी ताज हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे. या हॉटेल पॉलिटिक्सचा मोठा अर्थ नक्कीच असल्याचे राजकीय पंडित सांगत आहेत.

उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य

Live

Municipal Election 2026

09:12 PM

आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले

07:54 PM

उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश  

07:36 PM

नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार

07:31 PM

भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

उद्धव ठाकरे यांनी काल माध्यमांशी बोलताना एक सूचक वक्तव्य केलं. देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर हा शिवसेनाचा होईल असं सांगून ते मोकळं झाले. पण पडद्यामागील हालचालींना त्यामुळे हवा मिळाली. लागलीच शिंदे सेनेचे 29 नवनिर्वाचित नगरसेवक ताजमध्ये असल्याची वार्ता येऊन धडकली. पडद्यामागून मोठ्या हालचाली सुरू असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनाचा महापौर असावा असे वाटत असल्याची कुणकुण समोर आली आहे. तर आपले नगरसेवक फुटणार का? याची भीतीही सतावत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. जोपर्यंत महापौर आणि महत्त्वाच्या पदाचा फॉर्म्युला ठरत नाही. तोपर्यंत कदाचित ही दबावनीती, कुटनीती सुरू राहण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर मुंबईत शिवसेनेचा महापौर होईल या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मिश्किल प्रतिक्रिया दिली. देवाच्या म्हणजे माझ्या की वरच्या देवाच्या असा चिमटा त्यांनी काढला. वरच्या देवानंच ठरवलंय की महायुतीचा महापौर करायचा आहे. त्यामुळे महापौर महायुतीचाच होईल असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री हे सध्या पाच दिवसांच्या दाओस दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे महापौर पदासाठी आरक्षण सोडत नसल्याने राज्यातील महापौर पदाची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याप्रक्रियेसाठी १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात मोठी लॉबिंग आणि दबावतंत्राचा वापर होणार असं दिसतंय

शिंदेसेना किंगमेकरच्या भूमिकेत

मुंबई महापालिकेत शिंदेसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे. महायुतीला मुंबई महापालिकेत ११२ जागा मिळाल्या. भाजप सर्वात मोठा भाऊ आहे. भाजपला ८९ जागांवर दणदणीत विजय मिळाला आहे. तर शिंदे सेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन्यासाठी ११४ ही मॅजिक फिगर आवश्यक आहे. भाजपला शिंदे सेनेची गरज आहे. त्यामुळे पदरात चांगल्या जागा पाडून घेण्यासोबतच शिंदे सेनेचा महापौर पदावरही डोळा असल्याचे समोर येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी वर्षाचे निमित्त आहे. त्यामुळे मुंबईवर महापौर शिवसेनेचा व्हावा अशी आग्रही मागणी पुढे रेटल्या जात आहे. शिंदे सेना सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहे. येत्या काळात याविषयीचा राजकीय पट सर्वांसमोर येईल.