AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Mayor Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल, त्यात काय म्हटलय?

Mumbai Mayor Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेल अकाऊंटवर बॉम्बस्फोटाच्या धमकीचा मेल आला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Mumbai Mayor Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल, त्यात काय म्हटलय?
Mumbai Mayor Ritu Tawde
| Updated on: Aug 07, 2026 | 11:53 AM
Share

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्बस्फोटाची धमकीचा मेल आला आहे. महापौर कार्यालय, मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजार उडवण्याची धमकी या मेलमध्ये देण्यात आली आहे. 15 ऑगस्टपूर्वी मुंबईत स्फोट घडवण्याचा दावा करण्यात आला आहे. मेलमध्ये खलिस्तान समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या असून काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत. मुलांना शाळेत पाठवू नका, मेट्रोने प्रवास करू नका, असा इशाराही देण्यात आला आहे. यापूर्वीही महापौरांना दोन वेळा धमकीचे ई-मेल आले होते. धमकीचा मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे. ई-मेलचा आयपी, स्रोत आणि प्रेषकाचा शोध सायबर पोलिसांकडून घेतला जाईल.

रितू तावडे यांचं नाव अलीकडे महापौर बंगल्याच्या वादामुळे चर्चेत होतं. महापौर बंगल्याच्या कामासाठी 2 कोटी 89 लाखाचं टेंडर काढण्यात आल्यामुळे रितू तावडे यांच्यावर आरोप झाले. त्यांच्यावर टीका सुरु होती. या सर्व वादामुळे अखेर रितू तावडे यांनी मुंबई महापालिकेचं ते वादग्रस्त टेंडर मागे घेण्याचे आदेश दिले. “हे काम राणीच्या बागेचं होतं. पण महापौर बंगल्याचा चुकून यामध्ये उल्लेख झाला. या सगळ्यामुळे हे टेंडर मागे घेण्याचे आदेश मी दिलेले आहेत” अस स्पष्टीकरण महापौर रितू तावडे यांनी दिलं

फेक नेरेटिव्ह पसरवला जातोय

“हे सगळं काम राणीच्या बागेचं होतं. पण महापौर बंगल्याचा संबंध जोडून फेक नरेटिव पसरवण्यात आलं” असं रितू तावडे यांनी सांगितलं. “एक फेक नेरेटिव्ह पसरवला जातोय की महापौर बंगल्यासाठी आणखी खर्च केला जातोय. महापौर बंगला हेरिटेजकडे येतो. ही टेंडर प्रोसेस बंगल्याच्या अख्त्यारीत येत नाही. महापौर नाव जोडलं की मायलेज त्यांना मिळतो. आपली दुकानं उबाठा पक्ष चालवतोय. 2 कोटी 89 लाखाचा टेंडर काढलाय ते राणी बाग झू उद्यान विभागाकडून टेंडर काढलाय. हेरिटेज कडून काढलेला नाही” असं रितू तावडे म्हणाल्या. घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 132 मधून रितू तावडे  दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. आक्रमक चेहरा आणि अभ्यासू नगरसेविका अशी त्यांची ओळख आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...