AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी पुणे, आता मुंबई, थेट महापौरांना जीवे मारण्याची धमकी; ई-मेलमध्ये नेमकं काय?

मुंबईच्या महापौरांना गाडी आणि केबिन बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस आणि सायबर सेलकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून महापालिका मुख्यालयातील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

आधी पुणे, आता मुंबई, थेट महापौरांना जीवे मारण्याची धमकी; ई-मेलमध्ये नेमकं काय?
ritu tawde
| Updated on: Jun 10, 2026 | 12:58 PM
Share

पुणे महापालिकेपाठोपाठ आता मुंबई महानगरपालिकेतही धमकीचा मेल आल्याने राजकीय आणि पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना एका अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची आणि त्यांच्या कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. या अज्ञात इसमाने थेट ई-मेल पाठवून महापौरांची अधिकृत गाडी आणि महापालिका मुख्यालयातील त्यांचे केबिन बॉम्बने उडवून देऊ असा उल्लेख केला आहे. या प्रकारानंतर मुंबई पोलीस आणि पालिकेची सुरक्षा यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे.

पोलिसांचा तपास सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ई-मेल प्राप्त होताच महापालिका प्रशासनाने तातडीने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसह सायबर सेलने या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर हाती घेतला आहे. ज्या आयपी अ‍ॅड्रेसवरून (IP Address) हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे, त्याचा तांत्रिक शोध घेतला जात आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची कसून तपासणी केली जात आहे. महापौरांच्या केबिनबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, त्यांच्या दौऱ्यांदरम्यान आणि प्रवासादरम्यान वैयक्तिक सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आली आहे.

उपमहापौर संजय घाडी यांची प्रतिक्रिया

या धक्कादायक घटनेवर मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “जर असा मेल आला असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी याकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे. तसेच महापौरांना तात्काळ अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात यावी.”

हा ई-मेल एखाद्याने खोडसाळपणाने केला आहे की यामागे काही मोठे कारस्थान आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षारक्षकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने कळवण्यास सांगितले आहे.

पुणे महापालिकेतही धमकीचे सत्र; दीड तास तपासणी

मुंबईपूर्वी पुणे महानगरपालिकेतही अशाच प्रकारचा धमकीचा मेल आला होता. पुणे महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी तसेच दोन बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून महापौर कार्यालयाची कसून तपासणी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना पालिकेच्या मुख्य इमारतीबाहेर काढण्यात आले होते. तब्बल दीड तासांच्या कसून तपासणीनंतर काहीही संशयास्पद न आढळल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा पालिकेत कामकाज सुरू केले. या पार्श्वभूमीवर आता मुंबईतही पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर