AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे महापालिकेत हायअलर्ट! एका ईमेलने उडवली झोप; भरदिवसा संपूर्ण इमारत रिकामी

पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. सुरक्षेसाठी पालिका इमारत रिकामी करण्यात आली असून पोलीस आणि बॉम्ब स्कॉड तपास करत आहेत.

पुणे महापालिकेत हायअलर्ट! एका ईमेलने उडवली झोप; भरदिवसा संपूर्ण इमारत रिकामी
PMC
| Updated on: Jun 10, 2026 | 12:00 PM
Share

पुणे महानगरपालिका आणि राज्याच्या सुरक्षा यंत्रणेला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अधिकृत कार्यालयाला, नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय आणि नागपूरच्याच विधानभवन इमारतीला आयईडी (IED) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा संदेश एका ई-मेलद्वारे पाठवण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण पालिका वर्तुळात आणि पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.

‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा बदला घेण्याचा उल्लेख

मिळालेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ई-मेल खलिस्तान नॅशनल आर्मी कडून पाठवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. आज सकाळी ८ वाजून २० मिनिटांच्या सुमारास पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर हा मेल प्राप्त झाला. या ई-मेलमध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ आणि ‘ऑपरेशन वूड रोज’ चा थेट उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) तत्कालीन ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ला पाठिंबा दिला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी या तीन मुख्य ठिकाणांना लक्ष्य करण्यात येणार असल्याचे मेलमध्ये म्हटले आहे. या धमकीमध्ये विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संदर्भ देण्यात आला आहे.

महापालिका इमारत तातडीने केली रिकामी

सकाळच्या सुमारास हा धमकीचा मेल प्रशासनाच्या निदर्शनास येताच महापालिका प्रशासनाने कोणतीही जोखीम न पत्करता तात्काळ महत्त्वाची पावलं उचलली. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तातडीने इमारतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे खाली उतरण्याचे आदेश दिले. अवघ्या काही वेळातच संपूर्ण महापालिका इमारत रिकामी करण्यात आली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आणि परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

सुरक्षा यंत्रणा सतर्क; शोधमोहीम सुरू

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी, पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) श्वानपथकासह तातडीने महापालिका मुख्यालयात दाखल झाले. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण महापौर कार्यालय आणि महापालिकेच्या आवाराची कसून झाडाझडती सुरू केली आहे. नागपूरमध्येही RSS मुख्यालय आणि विधानभवन परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

सध्याच्या प्राथमिक तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सायबर पोलिसांकडून तपास सुरू

तसेच हा धमकीचा मेल नेमका कुठून पाठवण्यात आला, तो खरा आहे की केवळ अफवा पसरवण्यासाठी पाठवलेला बनावट मेल आहे, याचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली जात आहे. ई-मेलच्या आयपी ॲड्रेसचा माग काढून मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, “परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर