AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, प्रवाशांनो, वेळ बघूनच घराबाहेर पडा

मध्य रेल्वे, मुंबई विभाग आपल्या उपनगरीय विभागांत रविवार 17 ऑक्टोबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत हा मेगाब्लॉग असेल.

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, प्रवाशांनो, वेळ बघूनच घराबाहेर पडा
Mumbai Local
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Oct 16, 2021 | 8:05 AM
Share

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग आपल्या उपनगरीय विभागांत रविवार 17 ऑक्टोबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत हा मेगाब्लॉग असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.36 पर्यंत सुटणारी डाउन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविली जाऊन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे डाउन धिम्या मार्गावर वळविली जाईल.

घाटकोपर येथून सकाळी 10.40 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणारी अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविली जाऊन कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते सायंकाळी 4.47 पर्यंत वाशी /बेलापूर /पनवेल करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ब्लॉक कालावधी दरम्यान पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक दरम्यान सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.

हे देखरेख मेगाब्लॉक्स पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असंही रेल्वे प्रशासनाने सांगितले.

संबंधित बातम्या :

मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक, ‘या’ गाड्या होणार प्रभावित

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या गाड्यांच्या वेळापत्रकात कोणता बादल ?

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?